सोलापुरात अल्पवयीन मुलीवर 10 जणांचा गँगरेप, पाच जणांना अटक

हिंगणघाट जळीतकांड घटना ताजी असतानाच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Solapur Minor Girl Gang Rape, सोलापुरात अल्पवयीन मुलीवर 10 जणांचा गँगरेप, पाच जणांना अटक

सोलापूर : हिंगणघाट जळीतकांड घटना ताजी असतानाच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (Solapur Gang Rape). सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घृणास्पद घटना घडली. गेल्या सहा महिन्यांपासून या अल्पवयीन पीडितेवर 10 नराधम लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विजापूर पोलिसांनी रिक्षाचालकासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे (Solapur Minor Girl Gang Rape).

सोलापूर-विजापूर रस्त्यावर मंगळवारी एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत असल्याचं तिथल्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नागरिकांनी विजापूर नाका पोलीस स्टेशनला फोन करुन याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली. तेव्हा तिने घडलेली सारी हकिगत सांगितली.

अल्पवयीन मुलगी ही सोलापूरच्या एका महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. तिचे एका रिक्षाचालकाशी प्रेमसंबंध होते. त्याचा फायदा घेत या प्रियकर रिक्षाचालकासह त्याच्या इतर 9 मित्रांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे नराधम तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करत होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मंगळवारी रात्रीपर्यंत 5 जणांना अटक केली. इतर पाच जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत. प्रकरणातील बहुतांश आरोपी हे रिक्षाचालक असल्याचं समोर आलं आहे.

अल्पवयीन पीडिता ज्या महाविद्यालयात जायची त्याच मार्गावर रिक्षा चालवणारे हे सर्व रिक्षाचालक आहेत. मुलगी रोज रिक्षाने महाविद्यालयात जायची. याचाच फायदा घेत या रिक्षाचालकांनी संधी साधून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात बाललैंगिक अत्याचार, भादंवि कलम 376(ड), पॉस्को आणि अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे या करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *