कपडे बदलताना तरुण मुलींची व्हिडीओ रेकॉर्डिंग, अंधेरीत टेलरला अटक

मुंबईतील अनेक बड्या मॉलमध्ये आणि दुकानातील लेडीज ट्रायल रुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे (spy camera in ladies changing room) सापडले आहेत.

कपडे बदलताना तरुण मुलींची व्हिडीओ रेकॉर्डिंग, अंधेरीत टेलरला अटक

मुंबई : आतापर्यंत मुंबईतील अनेक बड्या मॉलमध्ये आणि दुकानातील लेडीज ट्रायल रुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे (spy camera in ladies changing room) सापडले आहेत. असाच एक प्रकार अंधेरीतील लोखंडवालामध्ये समोर आला आहे. अंधेरीत टेलरच्या दुकानात लेडीज ट्रायल रुममध्ये छुप्या कॅमेराद्वारे चित्रीकरण केलं जात होते. या धक्कादायक घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे (spy camera in ladies changing room) वातावरण आहे.

लोखंडवाला परिसरात एका तरुणीने टेलरकडे कपडे शिवण्यासाठी दिले होते. ते कपडे आणण्यासाठी ती टेलरकडे गेली. त्यावेळी टेलरने कपडे होत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी ट्रायल रुम वापरण्यास सांगितली. यावेळी तरुणीने ट्रायल रुममध्ये कपडे तपासून पाहिले. पण सहज तिचे लक्ष समोर असलेल्या पिशवीकडे गेले. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला. तरुणीने पिशवी उघडली असता त्यात मोठा कॅमेरा होता.

कॅमेरा सापडल्यावर तरुणीने टेलरला याबाबत विचारणा केली. त्यानंतर तरुणीने तातडीने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. तरुणीच्या धाडसामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, पोलिसांनी टेलरला ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी या टेलरला आपले दुकान बंद करण्यास सांगितले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *