पुत्रप्राप्तीच्या नावाखाली भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक

नागपूर : पुत्र प्राप्तीसाठी एका भोंदू बाबाने विवाहितेला फसवविल्याची घटना नागपुरात घडली. मुकेश उर्फ टिल्लू डागोर असे या भोंदू बाबाचे नाव आहे. तंत्र-मंत्राच्या सहाय्याने पुत्रप्राप्ती करून देतो, असे म्हणून या बाबाने एका महिलेकडून दोन वर्षात तब्बल सात लाख रूपये उकळले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदू बाबा आणि त्याच्या […]

पुत्रप्राप्तीच्या नावाखाली भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नागपूर : पुत्र प्राप्तीसाठी एका भोंदू बाबाने विवाहितेला फसवविल्याची घटना नागपुरात घडली. मुकेश उर्फ टिल्लू डागोर असे या भोंदू बाबाचे नाव आहे. तंत्र-मंत्राच्या सहाय्याने पुत्रप्राप्ती करून देतो, असे म्हणून या बाबाने एका महिलेकडून दोन वर्षात तब्बल सात लाख रूपये उकळले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात विवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदू बाबा आणि त्याच्या महिला शिष्ये विरोदात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पीडित महिलेचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून तिला पुत्र प्राप्ती झाली नाही. त्यासाठी तिने अनेक ठिकाणी वैद्यकीय तपासण्या केल्या. 2012 मध्ये पतीचा मृत्यू झाल्यानंतर 2013 मध्ये तिने सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत लग्न केलं. या दोघांचे लग्न होऊन दोन वर्षे झाली, तरीही तिला मूलबाळ होत नव्हतं. तिची अगतिकता पाहून शेजारी राहणाऱ्या रजनी माहुले हिने तिला विश्‍वासात घेतलं.

“रामनगर, पांढराबोडी येथे एक बाबा राहत असून तो माझ्या ओळखीचा आहे. त्याचा अनेकदा मी आशीर्वाद घेतलाय. तो मूलबाळ होण्यासाठी औषधी देतो. त्याचप्रमाणे जादूटोणा करून पुत्रप्राप्ती करून देतो”, असे तिने सांगितले. महिलेने ही माहिती आपल्या पतीला दिली. त्यामुळे पूजा करण्यासाठी महिलेचा पती तयार झाला.

रजनीने महिलेची मुकेश बाबासोबत भेट करून दिली. मुकेश बाबाने तिला मूल होणार, असं आश्‍वासन दिलं होतं. त्यासाठी पूजा करावी लागेल आणि खर्चही येईल, असंही सांगितलं होतं. यासाठी महिला तयार झाली. मुकेश बाबाने तिला दोन वर्षे काही औषधे खायला दिली. मात्र, तिला काहीच फायदा झाला नाही. दरबारात वारंवार पूजा करूनही मूलबाळ होत नसल्यामुळे टिल्लू बाबाने महिलेच्या घरात पूजा करण्याचं ठरवलं.

पुत्र प्राप्तीसाठी आसुसलेली महिला पूजेसाठी तयार झाली. प्रत्येक पूजेच्या वेळी दोघेही महिलेकडून 40 ते 50 हजार उकळत असत. अशा प्रकारे दोघांनीही महिलेकडून जवळपास सात लाख रुपये उकळले. काही उपयोग होत नसल्यानं टिल्लू बाबाच्या पूजापाठला महिला कंटाळली होती. औषधे आणि पूजा करूनही पुत्रप्राप्ती न झाल्याने आपली फसवणूक झाली, हे महिलेच्या लक्षात आलं. तिने पैसे परत मागितले असता टिल्लू बाबाने तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलेने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 2013 अन्वये गुन्हा दाखल करत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लिंबू, गंडे, प्लॅस्टिक बाहुली आणि जादूटोण्याचं इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.

कुठल्यातरी भोंदू बाबावर विश्‍वास ठेवून फसवणूक झाल्याचा हा काही पहिला प्रकार नाही. यापुर्वीही अनेकदा अंधश्रद्धेने अनेकांची फसवणूक झाली आहे. मात्र, तरीही हे प्रकार थांबत नाही. विज्ञानाच्या युगात आजही अंधश्रद्धेला बळी पडणे ही शोकांतिका आहे. त्यामुळे प्रत्येकाने सजग राहून अशा अंधश्रद्धेला बळी न पडता इतरांनाही यासंदर्भात जागरुक करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.