येरवडा जेलमध्ये संशयित दहशतवाद्याची हत्या, पुण्यातील दोन गुंडांची निर्दोष मुक्तता

येरवडा कारागृहात या दोन गुंडांनी 2012 मध्ये संशयित दहशतवाद्याची नाडीने गळा दाबून हत्या केली होती. अखेर सात वर्षांनी या खटल्याचा निकाल लागलाय. या खटल्याच्या सुनावणीत काही साक्षीदार फितूर झाल्याने दोघांची निर्दोष मुक्तता झाली.

येरवडा जेलमध्ये संशयित दहशतवाद्याची हत्या, पुण्यातील दोन गुंडांची निर्दोष मुक्तता

पुणे : संशयित दहशतवाद्याची हत्या केल्याप्रकरणी पुण्यातील दोन कुख्यात गुंडांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. येरवडा कारागृहात या दोन गुंडांनी 2012 मध्ये संशयित दहशतवाद्याची नाडीने गळा दाबून हत्या केली होती. अखेर सात वर्षांनी या खटल्याचा निकाल लागलाय. या खटल्याच्या सुनावणीत काही साक्षीदार फितूर झाल्याने दोघांची निर्दोष मुक्तता झाली.

संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी हत्याप्रकरणी कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि आलोक भालेराव निर्दोष सुटले आहेत. कातिलने जर्मन बेकरीच्या स्फोटावेळी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तो इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी असल्याचा एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं होतं.

8 जून 2012 रोजी नाडीने गळा आवळून कातिल सिद्दिकीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी शरद मोहोळ आणि अलोक भालेराववर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 वर्षे या प्रकरणाचा खटला चालला, अनेक साक्षीदार तपासण्यात आले, पण अखेर काही साक्षीदार फितूर झाल्याने दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली.

हत्या, खंडणी उकळणे, दरोडे, दहशत माजविण्याच्या गुन्ह्यात शरद मोहोळ टोळीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कारागृहात असतानाही मोहोळच्या नावाने खंडणी मागितल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकी याची येरवडा जेलमध्ये अतिसुरक्षित अंडा सेलमध्ये नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यात मोहोळ याच्यासह त्याचा साथीदार अलोक भालेराव यालाही आरोपी करण्यात आलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *