पॅनकार्ड, मतदारकार्डाबाबत निष्काळजी, 8 लाखांचा फटका

दिल्लीत राहणाऱ्या देवब्रत नावाच्या एका व्यक्तीला बसला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवृत्त कर्मचाऱ्याला निष्काळपणामुळे 8 लाखांचा चुना लागला (theft thieves retire man with pan card) आहे.

theft thieves retire man with pan card, पॅनकार्ड, मतदारकार्डाबाबत निष्काळजी, 8 लाखांचा फटका

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र यासारखे महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवावेत असे अनेकदा सांगितले (theft thieves retire man with pan card)  जाते. पण तरीही कधीकधी निष्काळजीपणाने आपण आपली कागदपत्रं कोणलाही देतो. मात्र अशाच निष्काळजीपणाचा फटका दिल्लीत राहणाऱ्या देवब्रत नावाच्या एका व्यक्तीला बसला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निवृत्त कर्मचाऱ्याला निष्काळजीपणामुळे 8 लाखांचा चुना लागला (theft thieves retire man with pan card) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या मदतीने आरोपीने क्रेडीट कार्ड आणि इतर विविध रुपाने कर्ज घेतले. या कर्जाच्या वसूलीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी नोटीस आली असता तेव्हा हे प्रकरण समोर आले.

यानंतर संबंधित व्यक्तीने बँकेत जाऊन याप्रकरणी चौकशी केली असता त्यांना कर्जासाठी आणि कार्डसाठी त्यांचे कागदपत्रं वापरण्यात आले होते. पण त्यावर फोटो तिसऱ्याच व्यक्तीचा होता. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावेळी पोलिसांना हे सर्व कागदपत्रांशी छेडछाड करण्याचा प्रकार असल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत नोएडा सेक्टर 34 मधील पवेलियन सोसायटीमध्ये राहणाऱ्या देवब्रत यांना आपल्या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांना जस्ट पे फायनान्स कंपनीकडून त्यांना फोन आला. त्यावेळी त्यांना तुम्ही अॅमेझॉनवरुन शॉपिंग केली आहे. त्या व्याजाची रक्कम तुम्ही अद्याप दिलेली नाही. त्यावेळी देवब्रत यांनी सांगितले की, मी अशाप्रकारची कोणतीही शॉपिंग केलेली नाही. त्यामुळे मी व्याज देणार नाही.

यानतंर काही दिवसांनी त्यांना बजाज फायनन्स कंपनींचा फोन आला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की तुम्ही बिग बाझारमधून 13 हजार रुपयांची शॉपिंग केली आहे. त्याचा तुम्ही व्याज अद्याप भरलेला नाही. यालाही त्यांनी विरोध केल्यानंतर बजाजकडून त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याची धमकी देण्यात आली. यावेळी त्यांना बजाज कंपनीकडून तुमचा पत्ता सेक्टर 49 च्या बरौला याठिकाणी आहे का असे विचारण्यात आली. त्यावेळी देवब्रत यांनी मी बरौला नाही, तर सेक्टर 34 मध्ये (theft thieves retire man with pan card) राहतो.

त्यावेळी कंपनीच्या काही कर्मचारी त्यांच्या घरी गेले. त्यांनी कर्ज घेतलेल्या कागदपत्र त्यांना दाखवली असता, त्यांनी सांगितले यातील मतदान पत्र आणि पॅन कार्ड माझं आहे. मात्र फोटो आणि पत्ता दुसऱ्या व्यक्तीचा आहे. या कागदपत्राच्या सहाय्याने अनेक कंपनीकडून कर्ज आणि क्रेडीट कार्ड काढण्यात आले. ज्याची एकणू कर्जाची रक्कम ही 8 लाख रुपये होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *