सरांचं विवाहित मॅडमवर एकतर्फी प्रेम, सनकी शिक्षकाचा चाकूहल्ला

एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने विवाहित शिक्षिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावात घडला. त्यानंतर शिक्षकाने स्वत:वरही चाकूने वार केले. दोन्ही शिक्षकांना जखमी अवस्थेत जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सरांचं विवाहित मॅडमवर एकतर्फी प्रेम, सनकी शिक्षकाचा चाकूहल्ला

जळगाव : एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने विवाहित शिक्षिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावात घडला. त्यानंतर शिक्षकाने स्वत:वरही चाकूने वार केले. दोन्ही शिक्षकांना जखमी अवस्थेत जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे दोन्ही शिक्षक बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत.

चंदा उमेश गडकळ (वय 32) या नाडगाव येथील आयटीआयच्या शिक्षिका आहेत. त्या गेल्या दीड वर्षांपासून येथे शिकवत आहेत. याच महाविद्यालयात के. ई. पाटील हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून के. ई. पाटील हा चंदा गडकळ यांना व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर अश्‍लील मॅसेज पाठवत होता. चंदा गडकळ यांनी या मॅसेजला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तर चंदा यांनी के. ई. पाटील महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार केली. मात्र, संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, अशी माहिती चंदा गडकळ यांचे पती उमेश गडकळ यांनी दिली.

चंदा गडकळ यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याने के. ई. पाटील संतापले. बुधवारी सकाळी चंदा गडकळ यांना वर्गात एकटे पाहून के. ई. पाटील यांनी वर्गाचा दरवाजा बंद केला. त्यानंतर चाकुने चंदा गडकळ यांच्यावर वार केले. के. ई. पाटील यांनी चंदा गडकळ यांच्या पोटावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर या सनकी शिक्षकाने स्वत:वरही वार केले.

हा प्रकार आयटीआय महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ चंदा यांना बोदवड येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. के. ई. पाटील यांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

संबंधित बातम्या :

कैद्यांचा घरगड्यासारखा वापर, रत्नागिरी जेलमधील धक्कादायक प्रकार

सोन्याचे दागिने देत नसल्याचा राग, रत्नागिरीत आईची दगडाने ठेचून हत्या

दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना मुंबईतून अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *