ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या नावाने धमकीचे फोन

विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना ठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे (Thane Minakshi Shinde) यांना धमकी फोन (Mayor Minakshi Shinde got threat call) येत आहेत.

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या नावाने धमकीचे फोन

ठाणे : विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना ठाण्याच्या महिला महापौर मिनाक्षी शिंदे (Thane Minakshi Shinde) यांना धमकी फोन (Mayor Minakshi Shinde got threat call) येत आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांच्या नावे हे फोन करण्यात येत असून शिंदे यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी (Mayor Minakshi Shinde got threat call) दिली आहे. तुम्हाला कुटुंबात राहायचे आहे ना, तर व्यवस्थित राहा, ठाण्यात कोणाशीही पंगा घेऊ नका अशा पद्धतीने फोन करुन धमकावल्याचे समोर आलं आहे. दरम्यान याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काल रात्री 11.30 च्या दरम्यान महापौर मिनाक्षी शिंदे (Mayor Minakshi Shinde) यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यांनी हा फोन उचलल्यानंतर तुम्ही मिनाक्षी शिंदे (Thane Minakshi Shinde) बोलता का असे विचारले. त्यावेळी मिनाक्षी यांनी हो, तुमचे काम काय असा प्रश्न विचारला. त्यानंतर फोन केलेल्या व्यक्तीने मी डोंगरीवरुन दाऊदचा माणूस बोलतो आहे असे सांगितले.

तुम्ही ठाण्यात खूप भांडणं करता. व्यवस्थित राहत नाही. यापुढे जर तुम्ही नीट राहिला नाहीत. तर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास देऊ अशी धमकी दिली. त्याशिवाय या पुढे नीट राहायचे अशी दमदाटीही या गुंडांकडून महापौरांना (Thane Minakshi Shinde) करण्यात आली.

यानंतर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान सध्या या धमकी देणाऱ्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. महापौरांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *