नवजात चिमुकलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदकाम, खड्ड्यातील मडक्यात दुसरंच जिवंत बाळ सापडलं!

उत्तर प्रदेशात नवजात मुलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात चक्क जिवंत नवजात मुलगी सापडली (Newborn girl found in a pit) आहे.

नवजात चिमुकलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदकाम, खड्ड्यातील मडक्यात दुसरंच जिवंत बाळ सापडलं!

लखनऊ : उत्तर प्रदेशात नवजात मुलीचा मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात चक्क जिवंत नवजात मुलगी सापडली (Newborn girl found in a pit) आहे. ही धक्कादायक घटना बरेली येथे घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. खड्ड्यात सापडलेल्या नवजात मुलीला (Newborn girl found in a pit) रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. अद्याप या मुलीची ओळख पटलेली नाही.

उत्तर प्रदेशमधील सीबीजंग येथे राहणाऱ्या वैशाली यांनी एका मुलीला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर काहीवेळाने नवजात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा पती हितेश यांनी मुलीचा मृतदेह पुरण्यासाठी स्मशान भूमीत गेले. मृतदेह पुरण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला. मात्र तीन फूट खड्डा खोदल्यानंतर त्यांना एक मडके सापडले. हे मडके बाहेर काढले असता त्यामध्ये एक नवजात जिवंत मुलगी सापडली.

त्यानंतर हितेशन तातडीने तिला मिठीत घेतले. तिच्यासाठी दुधाची व्यवस्था केली आणि स्थानिक पोलिसांना कळवले. पोलिसांनीही तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. यानंतर हितेशने आपल्या मुलीचा मृतदेह पुरला. घडलेल्या सर्व प्रकाराने हितेशलाही धक्का बसला.

खड्ड्यात सापडलेल्या या मुलीचं नाव डॉक्टरांनी सीता असं ठेवले आहे. सध्या या मुलीची तब्येत ठीक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनीही अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

“ज्याने कुणी हे अमानवीय कृत्य केले असेल, त्यांना नक्कीच शिक्षा दिली जाईल. पोलिसांचे एक पथक या मुलीच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना पकडले जाईल”, असं पोलीस अधिक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *