वसईतील दोन बंगल्यात 20 तोळे सोने आणि 73 हजारांची चोरी

ख्रिसमस सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. नाताळाच्या पूर्व संध्येला वसई ताल्युक्यातील प्रत्येक चर्च प्रार्थनेसाठी सज्ज असतात.

वसईतील दोन बंगल्यात 20 तोळे सोने आणि 73 हजारांची चोरी
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 8:45 AM

वसई : ख्रिसमस सणानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. नाताळाच्या पूर्व संध्येला वसई ताल्युक्यातील प्रत्येक चर्च प्रार्थनेसाठी सज्ज असतात. प्रत्येक घराघरातील ख्रिस्ती बांधव आपल्या घराला कुलूप लावून चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जात असतात. पण याचीच संधी साधून नालासोपारा पश्चिमेच्या नेवाळे गावातील 2 बंगल्यात चोरट्यांनी डल्ला (Theft in vasai Bungalow) मारला आहे. यामध्ये त्यांनी लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. या घटनेने एका पवित्र अशा ख्रिसमस सणावर एक विघ्नच (Theft in vasai Bungalow) आले आहे.

नालासोपारा नेवाले परिसरातील सराई या कुटुंबियांच्या 2 बंगल्यातील घराची कडी तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाले आहेत. चर्चमधील प्रार्थनेनंतर घरी आल्यावर ही घटना उघड झाली आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील नेवाळे परिसरात संजय सराई यांचा सांशी तर अँथोनी सराई यांचा आशीर्वाद हा बंगला आहे. हे दोन्ही बंगले आजूबाजूला आहेत. ख्रिसमस सणानिमित्त हे सर्व कुटुंब नऊच्या सुमारास 10 वाजून 20 मिनिटांच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी सांशी बंगल्यातील 10 ते 11 तोळे सोने, 53 हजाराची रोख, तर अँथोनी सराई यांच्या आशीर्वाद बंगल्यातील 20 हजार रुपये रोख आणि 10 तोळे सोने घेऊन चोर फरार झाले आहेत.

नालासोपारा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरील पंचनामा केला आहे. पण ऐन नाताळाच्या पूर्व संध्येला ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलसी फरार चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.