क्राईम सिटी नागपुरात 48 तासांत तीन हत्या

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ऑरेंज सिटी म्हणून देशातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केलेलं नागपूर शहर सध्या क्राईम सिटी होण्याच्या मार्गावर आहे. याचाच प्रत्यय देणाऱ्या तीन घटना नागपुरात घडल्या. नागपुरात गेल्या 48 तासात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे संपूर्ण शहर …

क्राईम सिटी नागपुरात 48 तासांत तीन हत्या

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ऑरेंज सिटी म्हणून देशातच नाही तर जगभरात आपली ओळख निर्माण केलेलं नागपूर शहर सध्या क्राईम सिटी होण्याच्या मार्गावर आहे. याचाच प्रत्यय देणाऱ्या तीन घटना नागपुरात घडल्या. नागपुरात गेल्या 48 तासात तीन हत्येच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. नागपुरातील लकडगंज आणि कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत या घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पहिली घटना : नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत शुभम वासनिक या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. शुभम हा गंगाबाई घाट परिसरात त्याच्या बहिणीसोबत राहायचा. इथे त्याची एका अल्पवयीन आरोपीशी मैत्री होती. हे दोघेही शुभमच्या घरी गेले. शुभम घरी एकटा जेवला, त्याने मित्राला जेवायला विचारलं नाही. याचाच राग मनात धरुन अल्पवयीन आरोपीने चाकूने वार करत शुभमची हत्या केली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला बेड्या ठोकल्या.

दुसरी घटना : नागपुरातील तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत गोळीबार चौकात अंकित धकाते या तरुणाची चाकू आणि तलवारीने वार करत हत्या करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्या आली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर तहसील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

तिसरी घटना : नागपुरातील भांडेवाडी परिसरात तिसऱ्या हत्याकांडाचा थरार पाहायला मिळाला. चंदन ऊर्फ कालू शर्मा या व्यक्तीची त्याच्याच मित्रांनी हत्या केली. चंदनचे आई-वडील बाहेर गेलेले असताना त्याचे काही मित्र त्याच्या घरी दारु पिण्यासाठी आले. त्यानंतर या मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि चंदनच्या मित्रांनीच चाकुने गळा कापून त्याची हत्या केली. घटनेनंतर भांडेवाडी परिसरात स्मशान शांतता पसरली आहे. चंदनच्या आई-वडिलांना मुलगा गमावल्याने मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणी कारवाई करत भांडेवाडी पोलिसांनी आरोपी मित्रांना अटक केली आहे.

केवळ 48 तासांत शहरात तीन हत्या झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणांनंतर नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यासोबतच नागपुरातील गुन्हेगारी कधी कमी होणार?, गुन्हेगारांवर पोलीस कधी नियंत्रण मिळवणार?, असे प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

संबंधित बातम्या :

दृश्यम चित्रपट पाहून खूनाचा कट, विश्वास नांगरे पाटलांकडून पर्दाफाश

नगरमध्ये “सैराट”, आंतरजातीय लग्न केल्यानं मुलीसह जावयाला पेटवलं

नारळ पाणी पाजून बलात्कार, व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेल, महिला ज्योतिषाचा अभिनेत्यावर आरोप

आईसोबत संबंध असल्याचा राग, अल्पवयीन मुलाकडून तरुणाची कुऱ्हाडीने हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *