नवी मुंबईत भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांची हत्या

तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामात तीन कामगारांचा निघृण खून करण्यात आला. बोनसरी गावात ही थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या कामगारांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली.

नवी मुंबईत भंगाराच्या गोदामात झोपलेल्या तीन कामगारांची हत्या

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामात तीन कामगारांचा निघृण खून करण्यात आला. बोनसरी गावात ही थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या कामगारांची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली. आर्थिक व्यवहारातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाजवळ अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामामध्ये हा प्रकार घडला.

झोपेच्यावेळीच हे हत्याकांड झालं असावं. या हत्येमागे चोरीऐवजी पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

मारेकऱ्यांनी तीनही कामगारांच्या डोक्यात जड वस्तूने हल्ला केला, त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन ही हत्या केली.  या हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरु केला.

घटनास्थळी पोलिसांचं डॉग स्क्वॉड आणि फिंगर प्रिंट शोधणारी टीम दाखल झाली. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथकं अनेकस्थळी रवाना झाली आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *