एक प्रेयसी दोन प्रियकर, प्रेयसीच्या दारातच दोघांमध्ये राडा, पोलिसांकडून अटक

प्रेमप्रकरणातून (Love affair) दोन युवकांमध्ये सुरु असलेली हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका युवकाजवळ देशी कट्टासह दोन जीवंत काडतूस आढळून आल्याचा प्रकार बुलडाण्यात (Buldhana) भिलवाड्यात घडला आहे.

एक प्रेयसी दोन प्रियकर, प्रेयसीच्या दारातच दोघांमध्ये राडा, पोलिसांकडून अटक

बुलडाणा : प्रेमप्रकरणातून (Love affair) दोन युवकांमध्ये सुरु असलेली हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका युवकाजवळ देशी कट्टासह दोन जीवंत काडतूस आढळून आल्याचा प्रकार बुलडाण्यात (Buldhana) भिलवाड्यात घडला आहे. एकाच युवतीवर दोघांचेही प्रेम (Girl affair) असल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे बोललं जात आहे. पोलिसांनी (Police) देशी कट्टा आणि काडतूस बाळगणाऱ्या युवकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तर कोयता वापरणाऱ्या युवकालादेखील अटक करण्यात आली आहे. गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे आणि सुभाष कुटे अशी अटक (Arrested) करणार आलेल्या दोघांची नावे आहेत.

गणेश तल्लारे (27) हा मूळ भूसावळ मध्ये राहणार असून गेल्या तीन वर्षांपासून बुलडाणा या ठिकाणी वास्तव्यास आहे. तर सुभाष कुटे हा मोताळा याठिकाणी राहणारा आहे. या दोघांचे बुलडाण्यातील भिलवाड्यातील त्याची प्रेयसी हिला भेटण्यासाठी गेला होता. मात्र त्यावेळी तिचा पूर्वीचा प्रियकर सुभाष कुटे हा उपस्थित होता.

त्यानंतर या दोघांमध्ये प्रेयसीला भेटण्यावरुन चांगलाच वाद झाला. या वादातून आरोपी सुभाष कुटे याने आरोपी गणेश तल्लारेवर त्याच्या जवळील कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी दिली असता पोलिसांनी तात्कळ घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता एकाच युवतीवर दोघांचे प्रेम असल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याशिवाय त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी गणेश तल्लारे यांच्या खिशात देशी कट्टा आणि दोन जीवंत काडतूस आढळून आलं आहेत.

या देशी कट्टासह 2 जीवंत काडतूसासह आरोपी गणेश तल्लारे यांस अटक करण्यात आली असून त्याच्यांविरुध्द आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी सुभाष कुटे याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. मात्र शहरात घडलेल्या या घटने मुळे एकच खळबळ उडाली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *