लाच म्हणून वेश्यांची मागणी करणारे पोलिस निलंबित

नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि 35 हजार रुपयांची मागणी केली होती. दोन्ही आरोपींचं निलंबन करण्यात आलं असून सामाजिक सुरक्षा पथकही बरखास्त करण्यात आलं आहे

लाच म्हणून वेश्यांची मागणी करणारे पोलिस निलंबित

नागपूर : लाच म्हणून पोलिसांनीच शरीरसुखासाठी तीन तरुणींची मागणी केल्याच्या प्रकरणाची नागपूर पोलिस आयुक्तांनी (Nagpur Police) गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर सामाजिक सुरक्षा शाखाच बरखास्त करण्यात आली आहे.

नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि 35 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार काल (बुधवारी) उघडकीस आला होता. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडेच नागपूर पोलिसांची शरीरसुखासाठी वेश्या पुरवण्याची मागणी

पोलिस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलिस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा या दोघांना अटक झाली होती. हे दोघंही नागपूर पोलिसातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते. त्यामुळे हे पथकच बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित पोलिस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

नागपूरमध्ये एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी तिला बेड्या ठोकण्याऐवजी तिला मोकळीक दिली. देह व्यापार सुरु ठेवण्यासाठी 35 हजार रुपये आणि शरीरसुखासाठी तीन तरुणी पुरवण्याची मागणी महिलेकडे केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *