उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीपसिंह सेंगर दोषी

कुलदीपसिंह सेंगर याची ऑगस्ट महिन्यात भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती

उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीपसिंह सेंगर दोषी
Follow us
| Updated on: Dec 16, 2019 | 4:00 PM

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणी आमदार कुलदीपसिंह सेंगर याला दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने दोषी (Kuldeep Singh Sengar convicted) ठरवलं आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 2017 मध्ये त्यावेळी अल्पवयीन असलेल्या तरुणीचं अपहरण करुन सेंगरने लैंगिक अत्याचार केले होते. कुलदीपसिंह सेंगर याची ऑगस्ट महिन्यात भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती. कोर्टाने या प्रकरणातील अन्य आरोपी शशी सिंग याला निर्दोष सोडलं आहे.

कलम 120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 363 (अपहरण), 366 (लग्नास उद्युक्त करण्यासाठी एखाद्या महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याशी (पोक्सो) संबंधित इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंगरच्या शिक्षेवर उद्या (मंगळवारी) युक्तिवाद होईल.

सीबीआय आणि आमदाराच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी 10 डिसेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. ही कार्यवाही इन-कॅमेरा झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार लखनौ येथील कोर्टाकडून ही केस दिल्लीला वर्ग करण्यात आल्यानंतर न्यायाधीशांनी ऑगस्टपासून या खटल्याची नियमित सुनावणी केली.

जुलैमध्ये फिर्यादी तरुणीच्या कारला भीषण अपघात झाला होता. यामध्ये बलात्काराच्या प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदार असलेली तिची मावशी मृत्युमुखी पडली होती, तर फिर्यादी तरुणी, तिची दुसरी मावशी आणि तरुणीचा वकील गंभीर जखमी झाले होते. कार दुर्घटनेमागे सेंगर असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला होता.

उन्नाव बलात्कार पीडितेचा कार अपघात, भाजप आमदार सेनगर यांच्यासह 25 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

एप्रिल 2018 मध्ये तरुणीच्या वडिलांना बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kuldeep Singh Sengar convicted

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.