चार मुलांच्या आईचा सेल्समनवर जडला जीव, नवऱ्याचा जीव घेऊन नदीत फेकलं

प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून महिला आणि तिच्या प्रियकराने तिच्या पतीचा जीव घेतल्याचं समोर आलं. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह पेटीत भरुन जवाहर पुलावरुन यमुना नदीत फेकून पळ काढला होता.

Wife Kills Husband with Boyfriend, चार मुलांच्या आईचा सेल्समनवर जडला जीव, नवऱ्याचा जीव घेऊन नदीत फेकलं

आग्रा : प्रेमात आंधळ्या झालेल्या विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे. 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हरिओम सिंह याचा शोध घेताना उलगडलेलं रहस्य पोलिसांनाही अवाक करणारं (Wife Kills Husband with Boyfriend) होतं.

सिकंदरा भागातील राधानगरमध्ये राहणारा कामगार हरिओम सिंह तीन नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. पत्नी बबली आणि तिचा प्रियकर कमल यांनीच हरिओमची हत्या केल्याचा संशय सुरुवातीपासून पोलिसांना होता. अखेर प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून दोघांनी हरिओमचा जीव घेतल्याचं समोर आलं. हत्येनंतर बबली आणि कमल यांनी मृतदेह पेटीत भरुन जवाहर पुलावरुन यमुना नदीत फेकून पळ काढला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून मृतदेहाचा शोध सुरु आहे.

36 वर्षांचा हरिओम सिंह हा राजवीर चेन फॅक्टरीत नोकरी करत होता. 17 वर्षांपूर्वी त्याचा विवाह बबली सिंह हिच्याशी झाला होता. त्यांना ज्योती, राशी, नमन आणि गुड्डू अशी चार मुलं आहेत. ‘अमर उजाला’ वेबसाईटने यासंदर्भात बातमी दिली आहे.

प्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

बबलीचा प्रियकर असलेला आरोपी करण हा साडीच्या दुकानात काम करत होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांची ओळख झाली होती. हरिओमलाही या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्याने बबलीला विरोध केला, पण तिने काहीएक ऐकलं नाही.

बबली आणि हरिओम चौघा मुलांसह वीस दिवसांपूर्वी राधानगर भागात राहायला आले. ज्योती आणि नमन ही मुलं आजोबा राजवीर यांच्याकडे राहायला गेली, तर राशी आणि गुड्डू त्यांच्यासोबतच राहत होती. तीन तारखेला अचानक हरिओम बेपत्ता झाला. बबली आणि दोन्ही मुलांशीही संपर्क न होऊ शकल्यामुळे राजवीर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.

पोलिसांच्या तपासात बबली आणि कमल यांनीच हरिओमची हत्या केल्याचं समोर आलं. दोघांनी त्याची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. बबलीने सांगितलेला घटनाक्रम चक्रावून टाकणारा आहे.

घटनेच्या दिवशी हरिओमने आपल्याला मारहाण केली, असा दावा बबलीने केला. बबलीने फोनवरुन कमलला याविषयी सांगितलं. तो रात्री साडेअकरा वाजता घरी आला. दोघांमध्ये वादावादी झालं. कमलने हरिओमची गळा दाबून हत्या केली. पकडलं जाण्याच्या भीतीने बबली कमलसोबत निघाली.

कमलने रात्री अडीच वाजता रिक्षा बूक केली. मृतदेह पेटीत भरुन ते निघाले. यमुना नदीजवळ जवाहर पुलावर त्यांनी रिक्षा थांबवली. पेटी नदीत फेकून दोघं दिल्लीला (Wife Kills Husband with Boyfriend) पळाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *