एका रात्रीत 20 दुकानात चोरी, 2 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल घेऊन चोरटे फरार

वसईत एका रात्रीत 20 दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 20 दुकानाच्या कडी तोडून 2 चोरटे चोरी करुन फरार झाले (Vasai thieve theft in 20 shop) आहेत.

Vasai thieve theft in 20 shop, एका रात्रीत 20 दुकानात चोरी, 2 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल घेऊन चोरटे फरार

वसई : वसईत एका रात्रीत 20 दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे. तब्बल 20 दुकानाच्या कडी तोडून 2 चोरटे चोरी करुन फरार झाले (Vasai thieve theft in 20 shop) आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वसई पश्चिममधील न्यू खोखाणी भवनमध्ये हा प्रकार घडला आहे. यात सर्व दुकानातील 2 लाखांहून अधिक मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले आहेत.

वसई रोड स्टेशनला लागूनच पश्चिमेला न्यू खोखाणी भवन आहे. या भवनमध्ये 30 ते 40 व्यावसायिक गाळे आहेत. या ठिकाणी कॉम्प्युटर क्लास, खाजगी क्लास, मेडिकल दुकान, स्टुडिओ, विविध कंपनीचे मोबाईल सर्व्हिस सेंटर, सी.ए.ऑफिस यासह अन्य कार्यालय आहेत. काल (16 जानेवारी) मध्यरात्री 1 ते 2 च्या सुमारास दोन चोरट्यांनी भवनात प्रवेश केला.

यावेळी मुख्य प्रवेशद्वार खुले असल्याने चोरटे दुकानाचे कडी कोयंदा तोडून आत आले. त्यांनी दुकानातील कॉम्प्युटर, कॅमेरा लेन्स, डीएसएलआर कॅमेरा, मोबाईल आणि प्रत्येक दुकानातील काही रोख रक्कम असा 2 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत (Vasai thieve theft in 20 shop) कैद झाला आहे.

वसई भवनमधील व्यावसायिक दुकान, कार्यालयात चोरी झाल्याचे सकाळी दुकान मालकांना कळले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या घटनेने व्यापारी, वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

वसई विरार नालासोपाऱ्यात दिवस रात्र चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका रात्रीत 20 दुकाने फोडून चोरी करून फरार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले (Vasai thieve theft in 20 shop) आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *