10 रुपयावरुन दादरमध्ये भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाचा खून

मुंबईत दादर रेल्वे स्टेशन बाहेर रात्री 11 च्या सुमारास भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार काल (24 जून) घडला.

10 रुपयावरुन दादरमध्ये भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाचा खून

मुंबई : मुंबईत दादर रेल्वे स्टेशन बाहेर रात्री 11 च्या सुमारास भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार काल (24 जून) घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली होती. 10 रुपयावरुन हा वाद झाल्याचे सांगितलं जात आहे. सोनी लाल असं आरोपीचं नाव आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दादर स्टेशन बाहेर भाजी विक्रेता आणि ग्राहकामध्ये भाजी घेण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की रागात भाजी विक्रेत्याने थेट ग्राहकावर चाकू हल्ला केला. जखमी ग्राहकाला तातडीने केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ग्राहकाचा मृत्यू झाला. मोहम्मद हनीफ असं मृताचे नाव आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून भाजी विक्रेत्याने घटनास्थळावरुन पळ काढला आहे.

खून झाल्यानंतर घटनास्थळावर पोहचलेल्या शिवाजी पार्क पोलिसांसोबत भाजी विक्रेत्यांनी वाद घातला. दादरसारख्या परिसरात ही घटना घडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

शिल्लक कारणावरुन झालेल्या वादामुळे थेट मोहम्मदला आपले प्राण गमवावे लागले आहे. शिवाजी पार्क पोलिसांचे एक पथक सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *