वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, मुंबईत आठवीच्या विद्यार्थ्यांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींच्या आईंच्या वाचनात हे चॅट आल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली.

वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, मुंबईत आठवीच्या विद्यार्थ्यांची व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा
Follow us
| Updated on: Dec 19, 2019 | 6:05 PM

मुंबई : वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, अशी भयानक चर्चा मुंबईत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर रंगल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या (आयबी) 13 ते 14 वर्ष वयोगटातील आठ विद्यार्थ्यांचं शाळेतून निलंबन (WhatsApp Chat on Classmate Rape) करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींच्या आईंच्या वाचनात हे चॅट आल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. धक्का बसलेल्या दोन्ही महिलांनी शाळेत धाव घेत, हा प्रकार शाळा प्रशासनाच्या कानावर घातला. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेत जाण्यासही नकार दर्शवला आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नुकतंच हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उमटली आहे. देशातच नव्हे, तर राज्यातही बलात्काराच्या काही घटनांमध्ये आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे. अशातच 13-14 वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलं बलात्कार करण्यारख्या असंवेदनशील गप्पा मारत असतील, तर ते भयावह म्हणायला हवं.

हैदराबाद गँगरेप आरोपींकडून आधी नऊ महिलांची बलात्कार करुन हत्या?

संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये बरंच मोठं चॅट रंगलं होतं. विशेष म्हणजे त्यात ‘गँग बँग’ म्हणजेच सामूहिक बलात्कार आणि ‘रेप’ अशा शब्दांचा भरणा होता. वर्गमित्रांच्या शरीरयष्टीवरील भाष्य (बॉडी शेमिंग) किंवा त्यांना समलिंगी संबोधणं (गे, लेस्बियन) या गोष्टीही संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅटमध्ये सुरु होत्या.

8 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ग्रुपवर या विषयी चॅट झालं होतं. सुरुवातीला अनेक मुलींभोवती रेंगाळणारं चॅट अखेरीस दोघींविषयी झालं. ‘आपण एका रात्री जाऊन बँग करुया’ अशा एका विद्यार्थ्याच्या कमेंटवर दुसऱ्यांनी होकार भरला. ‘मी तिला नष्ट करेन’ आणि ‘मी तिचं अस्तित्वच मिटवेन’ अशी हिंसक भाषाही त्यांच्या तोंडी दिसते. या प्रकरणाची शाळेने गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाईबाबत तपासणी (WhatsApp Chat on Classmate Rape) सुरु आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.