June 29, 2019 - TV9 Marathi

PAK vs AFG : अफगाणिस्तानला हरवलं, पण पाकिस्तानचं भविष्य आता भारताच्या हातात

विश्वचषकातील तुल्यबळ लढतीत पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखत मात केली आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानला 227 धावांचे लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 3 गडी राखत 230 धावा करत विजय मिळवला

Read More »

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसकडून पराग, रुपाली आणि नेहाची खरडपट्टी

बिग बॉसच्या भागात परागला महेश मांजरेकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच त्याच्या गैरवर्तनामुळे त्याची चांगलीच खरडपट्टीही काढली. दरम्यान यामुळे तो घरातून बाहेर पडल्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

Read More »

VIDEO : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांचा मैदानाबाहेर तुफान राडा

विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या सामन्यादरम्यान दोन्ही देशाच्या चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर बलुचिस्तानवरुन चांगलाच राडा झाला आहे. चाहत्यांमध्ये मैदानाबाहेर झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे एकच गोंधळ उडाला.

Read More »

राज्यातील 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम

दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळे नागरिक सुखावले असले, तरीही राज्यातील तब्बल 305 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची धक्कादायक माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Read More »

प्रकाश आंबेडकरांची 50 जागांची मागणी, काँग्रेस मात्र 25 जागांसाठी राजी : सूत्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (29 जून) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 25 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Read More »

आधी वेळेची, आता डाएटची सक्ती, मोदींकडून मंत्र्यांना बिस्कीट बंदी

आपल्यापैकी अनेकांसाठी चहा आणि बिस्कीट हाच सकाळचा नाश्ता असतो. मात्र आता याच चहा आणि बिस्कीटांच्या नाश्त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मुकावे लागणार आहे.
कारण आता केंद्रीय मंत्र्यांना चहासोबत बिस्कीटाऐवजी चक्क अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स मिळणार आहेत.

Read More »

मुंबईत 6 वर्षात 3323 इमारत दुर्घटना, 249 जणांचा मृत्यू, 919 जण जखमी

गेल्या 6 वर्षात मुंबईत तब्बल 3 हजार 323 इमारतींचे भाग कोसळले आहेत. यात 249 लोकांचा मृत्यू झाला असून 919 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली आहे.

Read More »

नवी जर्सी विराट कोहलीला आवडली का?

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विराटला ही जर्सी कशी वाटली याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली.

Read More »

Pune Wall Collapse : 8 बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर पंकज व्होरा आणि जगदीश अग्रवाल यांच्यासह 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Read More »