श्यामा प्रसाद मुखर्जी : कलम 370 विरोधातील देशातला पहिला आवाज

ज्या निर्णयाचं देशभरातून स्वागत झालं, त्या मागणीसाठी देशात पहिला आवाज तब्बल 70 वर्षांपूर्वी उठला होता. श्यामा प्रसाद मुखर्जी (Syama Prasad Mukherjee) यांनी पहिल्यांदा कलम 370 ला विरोध केला. त्यांनी (Syama Prasad Mukherjee) यासाठी देशभरात एक चळवळ उभी केली होती.

Read More »

इतिहास-भूगोल बदलला, देशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश

संसदेने कायद्याद्वारे जम्मू काश्मीरचं विभाजन करुन दोन केंद्रशासित प्रदेशांची (Union Territory) निर्मिती केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली. अमित शाहांनी सर्व प्रश्नांना उत्तरं देत काँग्रेसवरही जोरदार टीका केली.

Read More »

शशी थरुर यांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारचे अनेक दावे खोडले

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारच्या कलम 370 मधील तरतुदी रद्द करण्याच्या निर्णयावर आणि सरकारच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरकारकडून हा निर्णय घेताना करण्यात आलेले अनेक दावे खोडून काढले.

Read More »

Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे. आज सायंकाळी त्यांच्या छातीत अचानकपणे दुखायला लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रात्री त्यांची प्राणज्योत मालावली.

Read More »

राज्यसभेतील भाषणाचे पोस्टर इस्लामाबादमध्येही झळकले, संजय राऊत म्हणतात…

भाषणाचे पोस्टर्स पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही लागले आहेत. पाकिस्तानमधील एका तरुणाने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय हे भारतीय आमच्याच देशात येऊन त्यांचे पोस्टर लावत असल्याबद्दल त्याने राग व्यक्त केलाय. व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र साजिद नावाचा तरुण आपण पाकिस्तानमध्ये असल्याचं सांगतोय.

Read More »

काँग्रेसमधून आणखी एक आवाज, ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही कलम 370 हटवण्याचं समर्थन

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. या मुद्द्यावर काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते संसदेत विरोध करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रसचे अनेक युवा नेते या निर्णयाला पाठिंबा देताना दिसत आहेत. यात आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

Read More »

मृतसाठ्यात असलेल्या उजनीची 10 दिवसात शंभरीकडे वाटचाल

उजनी धरणात सध्या पुणे जिल्ह्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असून दौंडमधून 2 लाख 9 हजार 431 क्यूसेक्सने, तर बंडगार्डनमधून 1 लाख 23 हजार 427 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत धरणात 113 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय.

Read More »

ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा पहिल्या महायुद्धावर सिनेमा, ‘1917’चा धडाकेबाज ट्रेलर

‘स्कायफॉल’, ‘स्पेक्टर’ आणि ‘अमेरिकन ब्युटी’ यांसारख्या चित्रपटांचे ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडेस आता ‘1917’ हा पहिल्या महायुध्दावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत.

Read More »

रुपयाची घसरगुंडी, ऑटो इंडस्ट्रीत मंदी, अर्थव्यवस्था घसरण्याची कारणं

गुंतवणूक कमी होणे आणि ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी होणे ही यामागची प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. यामुळे 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था (Indian economy) होण्याच्या स्वप्नाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झालाय. पण तरीही भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा त्याच वेगाने पुढे जाईल, असाही अंदाज अर्थतज्ञ लावत आहेत.

Read More »

मोदी-शाहांचा मास्टर प्लॅन, मागील आठवड्यात काश्‍मीरला 2000 सॅटेलाईट फोन पाठवले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानातील कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीरसाठीच्या विशेष तरतुदी हटवण्याची घोषणा सोमवारी केली. मात्र, याची तयारी भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील घोषणापत्रापासूनच सुरु झाली होती. काश्‍मीरमध्ये सॅटेलाईट फोन पाठवणे, सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणात तैनात करणे हे सर्व निर्णय याचाच भाग होते.

Read More »