August 8, 2019 - TV9 Marathi

तुटलेल्या पुलाला लोखंडी शिडीचा आधार, नागरिकांचा दररोज जीवघेणा प्रवास

जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांना जोडणारा पिंजाळ नदीवरील पूल रविवारी झालेल्या महापुरात वाहून गेला. यामुळे वाडा आणि विक्रमगड, जव्हारचा संपर्क तुटला आहे.

Read More »

पुणे विभागात पावसाचे थैमान, 27 जणांचा मृत्यू, तर 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर

पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातला आहे. पुणे विभागात देखील पूर परिस्थितीचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे पुणे विभागात आतापर्यंत तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. यात आतापर्यंत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 5 ते 6 जण अजूनही बेपत्ता आहेत.

Read More »

काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांचंही शूटिंग होईल, मोदींकडून विकासाचा शब्द

सुरक्षेचं वातावरण निर्माण झाल्यास काश्मीरमध्ये फक्त भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सिनेमांचीही शुटिंग होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल, असं मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. भारतीय सिनेसृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी, असंही आवाहन त्यांनी केलं.

Read More »

रायगडमधील पुरात मगरीचा थरार, पावसाच्या पाण्यातून थेट घराच्या छतावर

सध्या रायगड जिल्ह्यातील महाडच्या पुराची भीषणता दाखवणारे 2 व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओत घराच्या कौलारु छतापर्यंत पुराचे पाणी आले आहे. त्या पाण्यातूनच एक मगरही घराच्या छतावर पोहचली आहे.

Read More »

सांगली-कोल्हापूरकरांची पुराशी झुंज, तर सत्ताधारी पक्षप्रवेशात गुंग

एकिकडे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मदतकार्यावर भर देण्याऐवजी अजूनही पक्षांतर आणि पक्षप्रवेशातच गुंतलेले दिसत आहे. त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आणि जीव जात असताना सरकार गंभीर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read More »

अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु, सांगलीतील पाणी ओसरणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी 5 लाख क्युसेक्सने विसर्ग (Almatti Dam) करण्याचे आदेश दिले. अलमट्टी धरणातून हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Read More »

कोल्हापूरमध्ये पंचगंगेला रौद्ररुप, 12 दिवसांच्या चिमुकल्यासह आईलाही पुराचा फटका

पुरामुळं आपल्या 12 दिवसांच्या चिमुकल्यासह माहेरी जाणाऱ्या आईला मागील 2 दिवसांपासून मध्येच एका ठिकाणी थांबून राहावं लागलं.

Read More »

राष्ट्रवादी पूरग्रस्तांना 50 लाख रुपयांची मदत करणार, शरद पवारांची घोषणा

राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचं वेतन या नैसर्गिक आपत्तीसाठी देतील आणि हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी दिली.

Read More »