September 1, 2019 - TV9 Marathi

Bigg Boss Marathi 2 | शिव ठाकरे बिग बॉस 2 चां विजेता

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 2) च्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने (Shiv Thackeray) आपले नाव कोरले आहे. अंतिम टप्प्यात शिव ठाकरे (Shiv Thackeray), वीणा जगताप (Veena Jagtap), नेहा शितोळे (Neha Shitole), शिवानी सुर्वे (Shivani Surve) किशोरी शहाणे-वीज (Kishori Shahane Veej) आणि आरोह वेलणकर (Aroh Velankar) यांच्यात जोरदार स्पर्धा झाली.

Read More »

पवारसाहेब 15 वर्षांच्या कामाचा हिशोब द्या, सोलापूरच्या सभेत अमित शाह पवारांवर बरसले

महाजनादेश यात्रेच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची(Amit Shah Solapur rally) प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. तर पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केलं.

Read More »

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा आकर्षक सूर्यमंदिराचा देखावा

पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचं हे 127 वं वर्ष आहे. त्यानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे.

Read More »

आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, शरद पवार भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला, अशी भावना शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

Read More »

सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या परखड शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. अनेकदा आपल्या भाषणातून ते सरकारचे कानही उपटत असतात. यावेळीही त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो, असं मत व्यक्त केलं.

Read More »

… अन्यथा राजू शेट्टींनी भर चौकात विष्ठा खायला तयार रहावं, सदाभाऊ खोतांची जीभ घसरली

कडकनाथ गैरव्यवहारप्रकरणात (Kadaknath Scam) थेट कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. त्यानंतर आरोप फेटाळताना सदाभाऊ खोत यांची मात्र जीभ घसरली आहे.

Read More »

विधानसभेची आचारसंहिता 13 तारखेला लागणार : रावसाहेब दानवे

येत्या 13 तारखेला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात जाहीर करुन टाकलं

Read More »

राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातील ‘या’ मंत्र्याची मोदी सरकारकडून राज्यपालपदी नियुक्ती

मोदी सरकारने (Modi Government) माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांची केरळच्या राज्यपालपदी (Governor of Kerala) नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे आरिफ मोहम्मद खान हे राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते. 1986 मध्ये त्यांनी राजीव गांधींच्या शाह बानो प्रकरणातील निर्णयाला विरोध करत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Read More »

मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे भारतावर आर्थिक मंदीचं संकट : मनमोहन सिंग

भारताचा आर्थिक विकास दर (GDP) घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला.

Read More »

‘अॅक्शन का स्कूल टाइम…’मधला हा चिमुरडा आता काय करतो?

‘अॅक्शन का स्कूल टाइम’ या जाहिरातीत झळकलेला कुरळ्या केसांचा मुलगा म्हणजे तेजन दिवानजी. तो आता डॉक्टर झाला असून कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये तो तज्ज्ञ आहे

Read More »