October 6, 2019 - TV9 Marathi

औरंगाबादेत भाजप-शिवसेनेचा बाप निवडून येईल असं यांना स्वप्नातही वाटलं नसेल: इम्तियाज जलील

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल (एमआयएम) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिवसेनेवर जहरी टीका (Imtiyaz Jaleel criticize BJP Shivsena) केली आहे.

Read More »

राज्यात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे (Maharashtra Rain). मात्र, जाता-जाताही पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. नाशिक, पुणे, मुंबईला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. आता पुढील आठवडा देखील पावसाचा असणार आहे. 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात ढगाळी हवामानासह वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Read More »

नाशकात परतीच्या पावसानं थैमान, अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली

नाशिकमध्ये परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे (Nashik Rain). आज (6 ऑक्टोबर) दुपारपासून नाशकात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरात पूरसदृश्य स्थिती उत्पन्न झाली आहे (Nashik Flood Situation). अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.

Read More »

मिशी नाही, तर काहीच नाही; मिशी असून मुलं नाही, पुण्यात आजी-माजी आमदारांची जुंपली

सध्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) कोणत्या मुद्द्यावर लढल्या जातील याचा काही भरोसा नाही. विकासाचा मुद्दा केव्हाच मागे पडला आहे.

Read More »

मेधा कुलकर्णींवर अन्याय करून निवडणूक लढवतोय : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि कोथरुडच्या मतदारांवर अन्याय (Injustice with Medha Kulkarni) करुन निवडणूक लढवत असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Read More »

दसरा मेळाव्यात गायकाचं तरुणीला स्टेजवर प्रपोज, नेत्याकडून जोडप्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस

कन्नड रॅपर चंदन शेट्टीने सरकारी दसरा मेळाव्यात थेट स्टेजवर प्रेयसीला प्रपोज (Kannad Rapper Chandan Shetty propose lover) केले.

Read More »

आरेतील वृक्षतोडीला विरोध, प्रकाश आंबेडकर पोलिसांच्या ताब्यात, बारामतीत दगडफेक

दिवसेंदिवस पर्यावरणीय प्रश्न गंभीर होत असताना नागरिकांमधील पर्यावरणीय संवेदनशीलताही वाढत असल्याचं दिसत आहे.

Read More »

अनधिकृत पोस्टर पडून तरुणीचा मृत्यू, माजी आमदार म्हणतो वाऱ्यावर गुन्हा नोंदवा

पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही. जर कोणा विरोधात गुन्हा नोंदवायचा असेलच, तर वाऱ्यावर नोंदवा, असे अकलेचे तारे अण्णाद्रमुक पक्षाचे माजी आमदार पोन्नईया यांनी तोडले.

Read More »

स्मार्ट सिटी नाशिकमध्ये चक्क वाहतूक पोलिसांवर शहरातील खड्डे बुजवण्याची वेळ

नाशिक शहरातील इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूकीचं नियोजन सुरळीत व्हावं यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी एक आदर्श (Nashik police Filing potholes) घालून दिला आहे.

Read More »