CBSE 10th Results 2022: कधी लागणार सीबीएसई बोर्डाचा 10वी 12वी चा निकाल? विद्यार्थी प्रतीक्षेत…

CBSE 10th Results 2022:

CBSE 10th Results 2022: कधी लागणार सीबीएसई बोर्डाचा 10वी 12वी चा निकाल? विद्यार्थी प्रतीक्षेत...
CBSE 10th Result 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:20 AM

CBSE 10th Results 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीचे एकूण 35 लाख विद्यार्थी आता परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीएसईची मूल्यांकन प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू असून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल (CBSE 10th 12thResults 2022) जाहीर केले जाऊ शकतात. बोर्ड cbse.gov.in आपल्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे.

कसा पाहणार निकाल

  • विद्यार्थ्यांनी प्रथम सीबीएसई www.cbse.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • यानंतर होम पेजवर दिलेल्या “सीबीएसई दहावी बारावी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा.
  • आता आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल डाऊनलोड करा
  • त्याची प्रिंट काढून ती तुमच्याकडे ठेवा

उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध

दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उमंग ॲपच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. उमंग (युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) हे केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे एक मोबाइल ॲप आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कशीटमध्ये त्वरित प्रवेश करता येईल.”

CBSE 10वी 2022 डिजिलॉकर ॲपद्वारे चेक करा

  • डिजिलॉकर ॲप किंवा वेबसाइटवर digilocker.gov.in जा
  • तुमच्या आधार कार्ड नंबरच्या मदतीने नोंदणी करा
  • क्रेडेन्शियल्सच्या मदतीने डिजिलॉकर खात्यात लॉग इन करा
  • ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’वर क्लिक करा.
  • आता ‘सीबीएसई 10 वी रिझल्ट 2022’ पास सर्टिफिकेट निवडा.
  • तुमचा रिझल्ट स्क्रीनवर ओपन होईल, डाऊनलोड करण्यासाठी लॉग इन करा.
  • ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट घ्या.

तुम्ही या वेबसाइट्सवर पाहू शकता निकाल

या वर्षी एकूण 21,16,209 विद्यार्थ्यांनी CBSE 10 वीची परीक्षा दिली. CBSE 10 वी टर्म 2 ची परीक्षा 75 विषयांमध्ये घेण्यात आली. 12 वीच्या वर्गाची परीक्षा 114 विषयांमध्ये घेण्यात आली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.