GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेपासून नोंदणी सुरु

अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरु होतं आहे.

GATE Exam 2022 : गेट परीक्षेच्या तारखा जाहीर, 'या' तारखेपासून नोंदणी सुरु
GATE 2022
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 4:15 PM

GATE Exam 2022 नवी दिल्ली : अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट 2022 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरु होतं आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षा (GATE) 2022 साठी नोंदणी gate.iitkgp.ac.in या वेबसाईटवर करण्यात येईल. गेट परीक्षा जे विद्यार्थी देऊ इच्छितात ते आयआयटी खरगपूरच्या वेबसाईटला भेट देईन अधिक माहिती घेऊ शकतात.

आयआटी खरगपूरकडे गेट आयोजनाची जबाबदारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल. उमेदवारांनी गेट परीक्षेची अधिकृत नोटिफिकेशन वाचल्याशिवाय अर्ज करु नये, असं आवाहन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय. गेट 2022 साठी नवीन वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन आयआयटी खरगपूरकडून लवकरच जारी केली जाईल. तसेच, GATE 2022 च्या परीक्षेची व्याप्ती वाढवण्यात आलीय. BDS आणि M. Pharm पदवी असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 30 ऑगस्ट 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2021 विलंब शुल्कासह अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021 अर्जामध्ये सुधारणा – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 श्रेणी आणि परीक्षेचे शहर बदलण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2022 GATE परीक्षेच्या प्रस्तावित तारखा – 5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी 2022 निकाल जाहीर होण्याची तात्पुरती तारीख – 17 मार्च 2022

नोंदणी कशी करावी?

गेट 2022 नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागेल. GATE 2022 च्या माहितीसाठी gate.iitkgp.ac.in वर भेट द्यावी लागेल. आयआयटी खरगपूर लवकरचं नवीन वेबसाईट जारी करणार आहे. विद्यार्थी गेट परीक्षेच्या एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात. परंतु, अर्ज फक्त एकच भरावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील तर त्यापैकी फक्त एक स्वीकारला जाईल इतर बाकीचे रद्द केले जातील. मात्र, त्यांचे शुल्क देखील परत केले जाणार नाही.

नोंदणी शुल्क

एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क : 750 रुपये लेट फीसह: 1250 रुपये इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी : 1500 रुपये विलंब फीसह 2000 रुपये

परीक्षा कधी होणार?

GATE 2022 परीक्षा 05 फेब्रुवारी, 06 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी आणि 13 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात येईल.आयआयटी खरगपूरने कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.

इतर बातम्या:

औरंगाबाद विद्यापीठात कोर्स करायचाय? जाणून घ्या कोणते कोर्स झाले बंद, 4 नवे अभ्यासक्रम अधिक क्षमतेने सुरु होणार

नागपूर हादरलं, डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांची आत्महत्या, शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का

GATE 2022 online applications started from 30 th August at IIT Kharagpur Know about Application Process and Exam Date

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.