Eklavya Scholarship : अर्ज किया है… ? ‘पदवीधर बेरोजगारांना’च मिळणार ही राज्य शासनाची शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा

Eklavya Scholarship : अर्ज किया है... ? 'पदवीधर बेरोजगारांना'च मिळणार ही राज्य शासनाची शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा
एकलव्य शिष्यवृत्ती
Image Credit source: facebook

त्याचबरोबर अर्जदार बेरोजगार असेल तरच या शिष्यवृत्तीचा विचार केला जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. नियम, अटी, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा भरायचा याची माहिती खाली दिलेली आहे.

रचना भोंडवे

|

Apr 29, 2022 | 11:20 AM

मुंबई : महाराष्ट्र उच्च शिक्षण संचालनालयाकडून पदवीधर (Degree Holder) असणाऱ्यांना एकलव्य शिष्यवृत्ती (Eklavya Scholarship) देण्यात येते.  ही एकलव्य शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून नुकतीच जाहीर करण्यात आलीये. निवड झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती अंतर्गत 5 हजार रुपये मिळणार आहेत. आर्टस् कॉमर्स सायन्स आणि लॉ विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या शिष्यवृत्तीसाठीच्या काही नियम आणि अटी आहेत. विद्यार्थी (Students) महाराष्ट्राबाहेर शिकलेला नसावा आणि तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 75,000पेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर अर्जदार बेरोजगार असेल तरच या शिष्यवृत्तीचा विचार केला जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे. नियम, अटी, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा भरायचा याची माहिती खाली दिलेली आहे. अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

एकलव्य शिष्यवृत्तीचे फायदे

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये मिळणार

आवश्यक पात्रता

1] अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक

2] आर्टस्, कॉमर्स आणि लॉ च्या विद्यार्थ्यांसाठी 60% गुण तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 70% गुण आवश्यक

3] अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 75 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावं.

4] अर्जदार अर्धवेळ किंवा पूर्णवेळ कुठेही काम करत नसावा

5] महाराष्ट्राबाहेर शिकणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत.

शिष्यवृत्तीसाठी लागणारे कागदपत्रं

  • तहसीलदाराचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • मागील वर्षाची मार्कशीट
  • अधिवास प्रमाणपत्र

अर्ज कसा करणार

‘अर्ज करा’ या बटणावर क्लिक करा.

‘नवीन अर्जदार नोंदणी’ वर क्लिक करा.

इमेल, फोन नंबर, सर्व आवश्यक तपशील भरा

OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा

तुम्ही जर OTP प्रमाणीकरणाची निवड केलीत तर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल.

आवश्यक ती माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा

युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा

आवश्यक कागदपत्रं अपलोड करून सबमिट करा, शिष्यवृत्ती अर्ज पूर्ण करा

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – Click Here

अर्ज कुठे करू शकता – Click Here

हे सुद्धा वाचा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें