शाळांना सुट्टी जाहीर; 2 मे 12 जूनपर्यंत शाळा राहणार बंद; एप्रिलअखेर पर्यंतच वर्ग सुरु

शाळांना सुट्टी जाहीर; 2 मे 12 जूनपर्यंत शाळा राहणार बंद; एप्रिलअखेर पर्यंतच वर्ग सुरु
राज्यीतील शाळांना 2 मे ते 12 जूनपर्यंत शाळांन सुट्टी राहणार
Image Credit source: TV9

महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शाळांच्या सुट्टींविषयीही शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 31, 2022 | 8:19 PM

मुंबईः महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) कोरोना निर्बंध (Corona restrictions) हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शाळांच्या सुट्टींविषयीही (School holidays) शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शाळांना 2 मे 12 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांच्या मे महिन्याच्या सुट्टीचा विषय गेल्या काही दिवसांपासून महत्वाचा मुद्दा बनला होता. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगितले होते की, शाळेतील अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्यास त्या घेण्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आज शाळांच्या सुट्टींविषयी महत्वपूर्ण निर्णय घेऊन 2 मे 12 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षणाच्या दर्जाविषयीही अनेकदा चर्चा

कोरोनामुळे राज्यासह जगातील शिक्षणाची संकल्पना बदलून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु झाले. ज्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षण घेण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाच्या दर्जाविषयीही अनेकदा चर्चा करण्यात आली. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा दर्जा घसरत असल्याची टीकाही करण्यात आली. त्यामुळे ज्या शाळांचा अभ्यासक्रम शिकवण्याचा अपूर्ण आहे, अशा शाळा एप्रिल महिन्यात सुरु राहणार, आणि ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्या शाळांना एप्रिलपासून सुट्टी मिळणार असल्याचंही शिक्षण आयुक्त सूरज पांढरे यांनी स्पष्ट केले होते.

एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरु

शाळांच्या सुट्यांविषयी आज महत्वपूर्ण निर्णय घेऊन एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरु राहणार असून 2 मे ते 12 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे सांगण्यात आले.

परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी

राज्यातील शाळा या एप्रिलअखेरपर्यंत सुरु राहणार असून परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सुट्टी इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या शाळांना देण्यात आली आहे. त्यामुळे ही सुट्टी संपली की, जूनमध्येच शाळा सुरु होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

मनाची चलबिचल होतेय? हा ‘बायपोलर डिसऑर्डर’चा प्रकार असू शकतो, दुर्लक्ष करु नका!

Rajesh Tope | शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा, 5 हजार रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च सरकार उचलणार : राजेश टोपे

हॉटेल,मुंबई लोकलमधील निर्बंध हटवले, मास्क लावणं ऐच्छिक : राजेश टोपे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें