केंद्र सरकार करणार इतक्या हजार शिक्षकांची भरती; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलं ट्वीट

ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही भरती तीन वर्षात केली जाणार आहे. ७४० एकलव्य मॉडल स्कूलमधून साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतील.

केंद्र सरकार करणार इतक्या हजार शिक्षकांची भरती; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलं ट्वीट
अमित शाह, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 5:15 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार ३८ हजार शिक्षकांची भरती करणार आहे. देशात ७४० एकलव्य मॉडल स्कूल (Eklavya Model School) होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे जाहीर केलं होतं. शनिवारी झारखंडच्या (Jharkhand) देवघर येथील विजय संकल्प रॅलीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी याची माहिती दिली. अमित शाह म्हणाले, देशात सात लाख रुपये उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. आदिवासी समुदायाच्या विकासासाठी ७४० एकलव्य मॉडल स्कूल स्थापन केले जाणार आहेत. ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

एक फेब्रुवारी २०२३ ला भारत सरकारने अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल डिजीटल लायब्ररीसह काही योजना जाहीर केल्या. यात प्रामुख्याने ७४० एकलव्य मॉडलच्या स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

१५७ नवीन नर्सिंग कॉलेज

मेडिकल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू केले जाणार आहेत. शिवाय मेडिकल साहित्य प्रशिक्षणासाठी नवीन कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. यासंदर्भात अमित शाह यांनी ट्वीटही केलं आहे.

एकलव्य मॉडल निवासीय विद्यालयांसाठी शिक्षक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांच्या ३८ हजार ८०० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एकलव्य शिक्षक कर्मचारी निवड परीक्षा होणार आहे.

साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतील

ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजंसीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही भरती तीन वर्षात केली जाणार आहे. ७४० एकलव्य मॉडल स्कूलमधून साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतील.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.