Night Schools: रात्रशाळा पुन्हा गजबजणार! शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दुबार शिक्षकाची नियुक्ती करताना दिवसा शाळेतील नियमित शिक्षक म्हणून कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे.

Night Schools: रात्रशाळा पुन्हा गजबजणार! शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
BMC School students will be given free items
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 7:59 AM

मुंबई: लवकरच रात्रशाळा (Night Schools) गजबजलेल्या पाहायला मिळणार आहेत. यापुढे महापालिका आणि खासगी शाळांमधील वर्गांसाठी रात्रशाळांकडून कोणतंही भाडं आकारलं जाणार नाही. त्याचबरोबर मुंबईसह अन्य महानगरपालिका (BMC) आणि खासगी शाळांमधील (Private Schools) प्रयोगशाळा, शाळांमधील वर्ग, वाचनालय, खेळाचे मैदान, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहे रात्रशाळांसाठी खुले करण्याचा निर्णय सुद्धा शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. रात्रशाळांसाठी वर्ग उपलब्ध न होणे, शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आणि यामुळे कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. दुबार शिक्षकाची नियुक्ती करताना दिवसा शाळेतील नियमित शिक्षक म्हणून कामाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे.

रात्रशाळांची पटसंख्या कमी का झाली?

  • राज्यात 176 रात्रशाळा असून एकट्या मुंबईत 150 हून अधिक रात्रशाळा, ज्युनियर कॉलेज
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 1 हजार 358 दुबार शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या.
  • माध्यमिक रात्रशाळेतील 865 दुबार शिक्षकांच्या सेवासमाप्तीनंतर त्याजागी दिवसा शाळेतील 174 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.

कशी असेल रात्रशाळा?

  • रात्रशाळांमधील दैनंदिन काम हे अडीच तासांचे असणार आहे
  • शिक्षकांचा कार्यभार अर्धवेळ असेल
  • जे शिक्षक रात्रशाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करीत आहेत किंवा होते. तसेच ते कोणत्याही दिवसा शाळेत कार्यरत नाहीत अशा शिक्षकांच्या सेवा या शासन निर्णयानुसार यापुढेही कायम ठेवण्यात आल्या आहेत.

2017पूर्वी रात्रशाळेत कार्यरत असणारे शिक्षक सेवा नियमानुसार होणार कायम

रात्रशाळांवर होणारा 34 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च वाचविण्यासाठी दिवसासह रात्रशाळेत काम करणाऱ्या दुबार शिक्षक कमी करण्याचा निर्णय 17 मे 2017 रोजी घेण्यात आला. या शासन निर्णयात दुबार शिक्षकांच्या जागी अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्याचे ठरविण्यात आले. खासगी शाळांतील कर्मचारी सेवा शर्ती नियम 1981 मधील नियम 22 (2) (ग) आणि 23 (1) (ब) नुसार शिक्षकांना दुबार काम करण्याची सवलत देण्यात आली आहे. या अधिनियमाशी मे 2017 चा शासन निर्णय विसंगत असल्याने शालेय शिक्षण विभागाने काल 30 जून रोजी सुधारित शासन निर्णय जाहीर केला असून यात मे 2017 पूर्वी जे शिक्षक रात्रशाळेत कार्यरत होते त्या शिक्षकांच्या सेवा नियमानुसार कायम करण्यात येणार आहेत. तसेच रात्रशाळेत दुबार शिक्षकांना नियुक्त करण्याआधी विभागातील शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत का याची खात्री करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.