UGC NET Exam 2022: आलं ना UGC NET चं ॲडमिट कार्ड! कसं डाऊनलोड करायचं बघा

UGC NET Exam 2022: यूजीसी नेट परीक्षा 9 जुलैपासून सुरू होत आहे. परीक्षेसाठी 3 तासांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेत दोन पेपर असतील.

UGC NET Exam 2022: आलं ना UGC NET चं ॲडमिट कार्ड! कसं डाऊनलोड करायचं बघा
UGC NET 2022
Image Credit source: Social Media
रचना भोंडवे

|

Jul 07, 2022 | 1:21 PM

UGC NET Exam 2022: NTA ने UGC NET परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड जारी केले आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र nta.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ॲडमिट कार्ड(UGC NET Admit Card 2022) डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या लॉगिन आयडीची आवश्यकता असेल. यापूर्वी, NTA ने UGC NET परीक्षेची तारीख आणि विषयनिहाय वेळापत्रक (Subject Wise Timetable) जाहीर केले होते. परीक्षेची शहर वाटप यादीही प्रसिद्ध झाली आहे. यूजीसी नेट (UGC NET) परीक्षा 9 जुलैपासून सुरू होत आहे. परीक्षेसाठी 3 तासांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेत दोन पेपर असतील.

UGC NET प्रवेशपत्र 2022 कसे डाउनलोड करावे

  1. UGC NET प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी nta.ac.in वर जा.
  2. त्यानंतर होमपेजवर जाऊन लॉगिन करा.
  3. तुमच्या स्क्रीनवर UGC NET ॲडमिट कार्ड दिसेल.
  4. त्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करा.

UGC NETॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर खालील गोष्टींची काळजी घ्या

UGC NET ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर, उमेदवारांनी दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. काही चुकीची माहिती असल्यास विभागाकडून ती दुरुस्त केली जाऊ शकते. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती UGC NET ॲडमिट कार्डवर दिलेली आहे. सर्व नियमांचे पालन अनिवार्य आहे.

हे सुद्धा वाचा

यूजीसी नेट परीक्षा 9 जुलैपासून सुरू होत आहे

NTA UGC NET 9 जुलैपासून सुरू होत असून 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या तारखा 9, 11 आणि 12 जुलै 2022 आणि 12, 13, 14, ऑगस्ट 2022 आहेत. यूजीसी नेट परीक्षा ही संगणक आधारित चाचणी (सीबीटी) आहे. परीक्षा ऑनलाइन होणार आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती ॲडमिट कार्डमध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांनी सर्व नियम काळजीपूर्वक वाचावेत. ॲडमिट कार्डशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें