Behala Paschim Election Result 2021 LIVE : बेहला पश्चिम मतदारसंघात भाजप आणि तृणमूलमध्ये चुरशीची लढत

Behala Paschim Assembly Election Result 2021 Live Update in Marathi | बेहला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने विद्यमान आमदार पार्थ चॅटर्जी यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून अभिनेत्री श्रावंती चटर्जी यांना उमेदवारी दिली आहे. 

Behala Paschim Election Result 2021 LIVE : बेहला पश्चिम मतदारसंघात भाजप आणि तृणमूलमध्ये चुरशीची लढत
बेहला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:04 AM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेसाठी (West Bengal Assembly Election 2021)  सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यातील बेहला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने (AITMC) विद्यमान आमदार पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून (BJP) अभिनेत्री श्रावंती चटर्जी (Srabanti Chatterjee) यांना उमेदवारी दिली आहे.  (Behala Paschim Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी (CPIM) पक्षात या मतदारसंघातून निहार भक्ता (Nihar Bhakta) यांना उमेदवारी दिली आहे. बेहला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एकूण आठ उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागेसाठी मतदान पार पडले. यासाठी बहुमतासाठी 148 हा मॅजिक फिगर आहे.

2016 ची निवडणूक कशी होती?

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बेहला पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या 20 वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे पार्थ चटर्जी हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) च्या कौस्तव चटर्जी यांचा 8 हजार 896 मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यावेळी पार्थ चटर्जी यांना जवळपास 1 लाख 02 हजार 114 मतं मिळाली होती. तर कौस्तव चटर्जी यांना 93 हजार 218 मते मिळाली होती. (Behala Paschim Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

विधानसभा क्षेत्रातील मतदारांची संख्या

2016 च्या निवडणुकीवेळी या मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या 2 लाख 94 हजार 404 इतकी होती. यातील 2 लाख 22 हजार 253 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. या ठिकाणी भाजपा तिसर्‍या क्रमांकावर असून त्यांच्या उमेदवाराला 18 हजार मते मिळाली होती. दरम्यान या संपूर्ण विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी एकूण 341 बूथ तयार करण्यात आले होते. या ठिकाणी 75 टक्केपेक्षा जास्त मतं देण्यात आली.

बेहला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा 1967 मध्ये मतदान झाले. त्यात सीपीएमने बाजी मारली होती. या जागेवर सीपीएमने सर्वाधिक वर्चस्व पाहायला मिळाले आहे. 1967 ते 1996 या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये फक्त एकदाच या ठिकाणी सीपीएमचा पराभव झाला होता. तृणमूल काँग्रेसने 2001 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर आतापर्यंत त्यांचा या मतदारसंघावर दबदबा पाहायला मिळत आहे.

गेल्या निवडणुकीचे आकडे

सध्याचे आमदार : पार्थ चटर्जी एकूण मिळालेली मतं : 1 लाख 02 हजार 114 मतदारसंघातील एकूण मतदार : 2 लाख 94 हजार 404 वोटर टर्नआउट : 75.49 टक्के एकूण उमेदवार : 8

(Behala Paschim Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

संबंधित बातम्या :

मोदींचाही बंगाल दौरा रद्द, उच्च स्तरीय बैठक बोलावली, राहुलजींच्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, काँग्रेसची प्रतिक्रिया

West Bengal Election 2021 : राहुल गांधी पाठोपाठ भाजपचाही मोठा निर्णय, फक्त 500 लोकांमध्ये होणार पंतप्रधान मोदींचा सभा!

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.