निवडणूक प्रचारावर 24 तासांची बंदी; ममता बॅनर्जींचे निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलन

वादग्रस्त विधान केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तासांची प्रचार बंदी केली आहे. (Mamata Banerjee holds protest against EC ban in West Bengal)

निवडणूक प्रचारावर 24 तासांची बंदी; ममता बॅनर्जींचे निवडणूक आयोगाविरोधात धरणे आंदोलन
Mamata Banerjee

कोलकाता: वादग्रस्त विधान केल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तासांची प्रचार बंदी केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या संतापल्या असून त्यांनी आज दुपारपासून थेट निवडणूक आयोगाच्या विरोधातच धरणे आंदोलन सुरू केले आहे. ममतादीदींनी मेयो रोडवरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोरच हे धरणे आंदोलन सुरू केले आहे. लष्कराने त्यांना धरणे आंदोलनाची परवानगी दिलेली नसताानाही त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं आहे. (Mamata Banerjee holds protest against EC ban in West Bengal)

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जींवर सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. त्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. सकाळी 9.40 वाजता टीएमसीने लष्कराला पत्र लिहून धरणे आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर इतक्या कमी वेळेत धरणे आंदोलनाला परवानगी देता येणं शक्य नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. मात्र, त्यानंतरही ममता दीदींनी दुपारी 11.30 वाजता आंदोलन स्थळी जाऊन धरणे धरण्यास सुरुवात केली.

टीएमसीकडून सवाल

दरम्यान, निवडणूक आयोगाने लादलेल्या प्रचार बंदीवर टीएमसीच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिलीप घोष, राहुल सिन्हा यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांची वक्तव्ये निडणूक आयोगाला दिसत नाहीत का? निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनलेला आहे, असं टीएमसीचे नेते अणुब्रत मंडल यांनी म्हटलं आहे. तर, निवडणूक आयोगाचा हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. असंवैधानिक आहे. आयोग पक्षपातीपणा करत आहे. भाजप नेत्यांविरोधात कारवाई होत नाही, असा आरोप टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केली आहे.

मोदींच्या त्या वक्तव्यानंतर कारवाई?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ दिवसांपूर्वी बंगालमध्ये रॅली केली होती. यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच सवाल केले होते. ममता बॅनर्जी उघडपणे मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. खरे तर त्यांच्या हातून मुस्लिम व्होटबँक निघून गेल्याचंच दिसत आहे. ममता बॅनर्जींनी मुस्लिमांना मतदान करण्यासाठी एकजूट होण्याचं आवाहन करूनही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली नाही. जर आम्ही हिंदूंना एकजूट होऊन भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं असतं तर आतापर्यंत आम्हाला निवडणूक आयोगाची नोटीस आली असती, असा आरोप मोदींनी केला होता. मोदींचं हे विधान म्हणजे निवडणूक आयोगाला ममता बॅनर्जींवर कारवाई करण्यासाठीचे अप्रत्यक्ष निर्देशच होते, त्यामुळेच ममता बॅनर्जींवर कारवाई करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

ममता दीदींवर कारवाई का?

निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय. तसंच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय. (Mamata Banerjee holds protest against EC ban in West Bengal)

 

संबंधित बातम्या:

 ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी!

ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा, मला शिव्या घाला – पंतप्रधान मोदी

मतदानावेळी बंगालमध्ये हिंसा उसळली, सीआयएसफ जवानांचा गोळीबार; पाच ठार

(Mamata Banerjee holds protest against EC ban in West Bengal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI