Assembly Election Result 2021: ना तामिळनाडू… ना केरळात ताकद वाढली… भाजपची दक्षिणेवरील स्वारी नाहीच

केरळ आणि तामिळनाडूत भाजपला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही. (why bjp not won in Tamil Nadu, Kerala Assembly elections?, read)

Assembly Election Result 2021: ना तामिळनाडू... ना केरळात ताकद वाढली... भाजपची दक्षिणेवरील स्वारी नाहीच
अमित शाह, नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 6:11 PM

चेन्नई: केरळ आणि तामिळनाडूत भाजपला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही. पश्चिम बंगालमध्ये भरघोस यश मिळालं आहे. परंतु, सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं नाही. तर आसाममध्ये सत्ता राखण्यात भाजपला यश मिळालं आहे. नाही म्हणायला पुद्दुचेरीमध्ये भाजपला सत्ता परिवर्तन करण्यात यश मिळालं आहे. एकंदरीत भाजपला सध्या तरी दक्षिणेकडील राज्यांमध्ये आपला जम बसवण्यात यश आलेलं नसल्याचं आजच्या निकालावरून दिसून आलं आहे. (why bjp not won in Tamil Nadu, Kerala Assembly elections?, read)

तामिळनाडूत एकूण 234 जागा आहेत. या ठिकाणी थेट एआयएडीएमके आणि डीएमकेमध्ये मुख्य लढत होती. या निवडणुकीत डीएमकेने 142 जागांवर तर एआयएडीएमकेने 88 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने एआयएडीएमकेसोबत युती केली होती. मात्र, या युतीत भाजपच्या वाट्याला दोन जागा येण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षाशी युती करूनही तामिळनाडूत भाजपला फारसं यश मिळताना दिसत नसल्याने दक्षिणेतील या राज्यातही भाजपला हातपाय पसरणं शक्य नसल्याचं दिसून आलं आहे.

श्रीधरन आले, पण उपयोक काय?

दक्षिण भारतातील केरळवरही भाजपने गेल्या दोन वर्षांपासून फोकस केला होता. त्यांनी मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार म्हणूनही घोषित केलं होतं. गेल्या निवडणुकीत भाजपला केरळमध्ये केवळ 12 टक्के मते मिळाली होती आणि त्यांची एकच सीट निवडून आली होती. यावेळीही भाजपची हीच स्थिती दिसत आहे. भाजपचे श्रीधरनच आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.

सबरीमाला मंदिराला पाठिंबा

भाजपने केरळातील सबरीमाला मंदिराची बाजू घेतली होती. लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करण्याची घोषणाही भाजपने केली होती. तसेच गोमांसच्या मुद्द्यावर भाजपने मौन साधलं होतं. मात्र, तरीही केरळच्या नागरिकांनी भाजपला नाकारल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत एलडीएफ 93 तर काँग्रेस आघाडीच्या यूडीएफने 43 जागांवर आघाडी घेतली आहे.

केवळ कर्नाटकात सत्ता

दक्षिणेत भाजपची केवळ कर्नाटकात सत्ता आहे. कर्नाटक आणि तेलंगना सोडता दक्षिणेतील इतर राज्यात भाजपचं नमोनिशान नाहीये. आता तामिळनाडू आणि केरळच्या निवडणुकीतूनही त्यांच्या पदरी अपयश आलं आहे. (why bjp not won in Tamil Nadu, Kerala Assembly elections?, read)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचा वाघिणी म्हणून उल्लेख, निवडणूक जिंकल्याबद्दल अनोख्या शब्दात शुभेच्छा

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

West Bengal Election Results 2021: बंगालवरील स्वारीचं भाजपचं स्वप्नं का भंगलं?; प्रशांत किशोर यांनी दिलं ‘हे’ कारण

(why bjp not won in Tamil Nadu, Kerala Assembly elections?, read)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.