Uttar pradesh assembly election 2022: काँग्रेसला मोठा झटका; स्टार प्रचारक RPN सिंह यांचा पक्षाला रामराम

Uttar pradesh assembly election 2022: काँग्रेसला मोठा झटका; स्टार प्रचारक RPN सिंह यांचा पक्षाला रामराम
आरपीएन सिंह

आरपीएन सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष त्यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात कुशीनगर येथील पडरौना विधानसभा मतदार संघातून तिकीट देऊ शकतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 25, 2022 | 1:46 PM

नवी दिल्लीः उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (Uttar pradesh assembly election) तोंडावर काँग्रेसला (Congress) जोरदार झटका बसला असून, दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ते आज दुपारी तीनच्या सुमारास भारतीय जनता पक्षामध्ये (Bjp) प्रवेश करणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीएन सिंह यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात कुशीनगरच्या पडरौना विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने केलीय. दरम्यान, अशी चर्चा सुरू असताना आरपीएन सिंह यानी आपले ट्वीटर हँडर बदलले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षासंबंधीच्या पदाची माहिती तिथून हटवली आहे. शिवाय त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, सारा देश प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करत आहे. मी आपल्या राजकीय जीवनात नव्या अध्यायाला सुरुवात करतोय. जयहिंद. विशेष म्हणजे काँग्रेसने कालच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात आरपीएन सिंह यांचे नावही होते.

जातीचे गणित प्रबळ

आरपीएन सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष त्यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात कुशीनगर येथील पडरौना विधानसभा मतदार संघातून तिकीट देऊ शकतो. आरपीएन सिंहे हे स्वतः सैंथवार-कुर्मी या मागास जातीतील आहेत. पूर्वांचल भागात सैंथवार जाती मतदारांची संख्या जास्त आहे. कुशीनगर, गोरखपूर, देवरिया या भागात सैंथवार-कु्र्मी जास्त आढळतात. शिवाय आरपीएन सिंह यांचे पूर्वांचलमध्ये वर्चस्व आहे.

स्टार प्रचारकांची यादी जाहीर

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सोमवारी काँग्रेसने पहिल्या टप्प्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान होणार असून, त्यासाठी 30 नेत्यांवर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाब नबी आझाद, राज बब्बर, सचिन पायलट, कन्हैया कुमार यांची नावे आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने या यादीत आरपीएन सिंह यांचे नावही होते. मात्र, त्यांनी भाजपमध्ये जायचा निर्धार पक्का केला आहे.

10 मार्च रोजी मतमोजणी

उत्तर प्रदेशमध्ये विधआनसभेच्या एकूण 403 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला मतदान होईल. त्याची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशमधून होईल. दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी, तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी आणि चौथ्या टप्पाचे मतदान 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान 27 फेब्रुवारी, सहाव्या टप्प्याचे मतदान 3 मार्च, तर सातव्या टप्प्याचे मतदान 7 मार्च रोजी होणार आहे. या ठिकाणी 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

इतर बातम्याः

Uttar pradesh assembly election 2022: बसपाची 51 उमेदवारांची यादी जाहीर, मायावतींचा ‘नवा नारा’ काय?

UP Assembly Election 2022: काँग्रेसचा युथ मॅनिफेस्टो, 20 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें