UP Assembly Election: समाजवादी पक्षाने यावेळी काँग्रेस-बसपाला का टाळले, अखिलेश यादव यांचा खुलासा

समाजवादी पार्टीने यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय पार्टी, जनवादी पार्टी, महान दल, अपना दल, प्रगतशील समाजवादी पार्टी-लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या छोट्या पक्षांची मोट बांधली आहे.

UP Assembly Election: समाजवादी पक्षाने यावेळी काँग्रेस-बसपाला का टाळले, अखिलेश यादव यांचा खुलासा
समाजवादी पक्षाने यावेळी काँग्रेस-बसपाला का टाळले, अखिलेश यादव यांचा खुलासा
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 6:24 PM

UP Assembly Election: समाजवादी पक्षाने यावेळी काँग्रेस-बसपाला का टाळले, अखिलेश यादव यांचा खुलासा

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) तोंडावर राजकीय चर्चेने राजकारण तापलेले असताना आता (akhilesh yadav) अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने यावेळी काँग्रेस-बसपाला का टाळले, या खुलासा अखिलेश यादव यांनी केल्यामुळे राजकारणाला आणखी वेगळं मिळाल्याचे चित्र दिसतंय. यावेळी अखिलेश यादव यांची रणनिती वेगळी आखली आहे. यावेळी समाजवादी पार्टी काही छोट्या पक्षांची मोट बांधून आपली निवडणुक लढवत आहे. यावेळी सपाने मोठ्या पक्षांऐवजी छोट्या पक्षांना का पसंती दिली आहे. मागच्या काही निवडणुकीध्ये काँग्रेस आणि (bsp) बसपासारख्या मोठ्या पक्षांशी हातमिळवणी करणारी सपा यावेळी त्यांना का टाळत आहे, याचं स्पष्टीकरणं अखिलेश यादव यांनी दिलं आहे.

समाजवादी पार्टीने यावेळी राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय पार्टी, जनवादी पार्टी, महान दल, अपना दल, प्रगतशील समाजवादी पार्टी-लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या छोट्या पक्षांची मोट बांधली आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर 2017 मध्ये अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी हात मिळवणी केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी समाजवादी पार्टीने बीएसपीशी हातमिळवणी केली होती. त्याचा फायदा समाजवादी पार्टीला झाला नसल्याने अखिलेश यादव यांनी रणनितीत बदल केला आहे.

दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यावेळी बसपा मोठ्या पक्षांना का टाळत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांना मोठ्या पक्षांसोबत जो अनुभव आहे, त्यावरून असं स्पष्ट होतंय की, मोठ्या पक्षांसोबत गेल्यानंतर हवे तसे निकाल हाती येत नाहीत, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. त्यामुळे समाजवादी पार्टीने युपीच्या छोट्या पक्षांसोबत युती केली आहे. सपाने सामाजिक न्यायावर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तत्त्वांवर बोलत असतात, त्या पक्षांना एकत्र आणून एक मोठी ताकद बनवली आहे.

यापुढे अखिलेश यादव असे म्हणाले की, बसपाला जे बदल मोठ्या पक्षांना सोबत घेऊन करता आले नाहीत. ते काम आता प्रादेशिक पक्षांना घेऊन केले जाईल. सपामध्ये भाजपचे मंत्री आमदार, मंत्री येण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, भाजपचे धरमसिंह सैनीही सपामध्ये दाखल झाले. सैनी यांच्या आगमनाने आमच्या ‘सकारात्मक आणि प्रगतीशील राजकारणाला’ अधिक उत्साह आणि बळ मिळाले आहे. एसपीमध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा!

UP Assembly Election: अखिलेशच्या नेतृत्वात भाजपच्या विरोधात लढणार शरद पवार

UP Assembly Election: काँग्रेसच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर; बलात्कार पीडीतेच्या आईला तिकीट

UP Assembly Election: भाजपच्या 14 तासांच्या बैठकीनंतर पहिल्या तीन टप्प्यांसाठी 172 उमेदवारांची यादी फायनल

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.