भाजपला झटका; बंगालमधून लढणाऱ्या स्वपन दासगुप्ता यांचा अखेर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

पश्चिम बंगाल राखण्यासाठी भाजपने चार खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. (Swapan Dasgupta tenders resignation from Rajya Sabha after getting BJP ticket)

भाजपला झटका; बंगालमधून लढणाऱ्या स्वपन दासगुप्ता यांचा अखेर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
Swapan Dasgupta
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 3:05 PM

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल राखण्यासाठी भाजपने चार खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्यात राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता यांचाही समावेश होता. पण भाजपची ही खेळी त्यांच्याच अंगलट आली आहे. राज्यसभा सदस्याला विधानसभेची निवडणूक लढवता येते का?, असा सवाल टीएमसी आणि काँग्रेसने विचारला. त्यामुळे अखेर दासगुप्ता यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. (Swapan Dasgupta tenders resignation from Rajya Sabha after getting BJP ticket)

स्वपन दासगुप्ता हे भाजपच्या तिकीटावर पश्चिम बंगालच्या तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून लढणार होते. भाजपने त्यांच्या नावाची घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी सभापतींना पाठवण्यात आला असून हा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. दासगुप्ता हे 2016पासून राज्यसभेतील राष्ट्रपतील नियुक्त सदस्य आहेत.

दासगुप्तांचं ट्विट

या घटनेनंतर दासगुप्ता यांनी ट्विट करून त्यांचं म्हणणं मांडलं आहे. बंगालच्या लढाईत पूर्णपणे झोकून देण्यासाठी मी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. येत्या काही दिवसात मी तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-टीएमसीचा आक्षेप

दरम्यान, दासगुप्ता यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून याबाबतचं स्पष्टीकरण मागितलं होतं. दासगुप्ता यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सभागृहाचा राजीनामा दिला नाही आणि कोणत्याही राजकीय पक्षात सामिल झालेले नाहीत, असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं. राज्यसभेचा एक नामनिर्देशित सदस्य नामांकनाच्या सहा महिन्याच्या आत कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालेला नाही. त्यामुळे राज्यसभेचा राजीनामा न देता अराजकीय पक्षाचा नामनिर्देशित सदस्य विधानसभा निवडणूक लढवू शकतो का?, असा सवाल जयराम रमेश यांनी पत्रातून केला आहे. दासगुप्ता यांनी राजीनाम्याची घोषणाही केली नाही. त्यामुळे काही सांगण्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं. तर, दासगुप्ता यांनी संविधानाच्या 10 व्या अनुसूचीचं उल्लंघन केल्याचा आरोप तृणमूलचे खासदार मोहुआ मोईत्रा यांनी केला आहे. (Swapan Dasgupta tenders resignation from Rajya Sabha after getting BJP ticket)

तृणमूलचा आरोप

तृणमूलचे खासदार मोहुआ मोईत्रा यांनी ट्विट करून त्यांची भूमिका मांडली होती. दासगुप्ता बंगालमधून भाजपच्या तिकीटकावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. संविधानाच्या 10 व्या अनुसूचीनुसार एखादा सदस्य शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करत असेल तरच तो कोणत्याही राजकीय पक्षात सामिल होऊ शकतो. नाही तर तो राज्यसभा सदस्य म्हणून अपात्र ठरतो. दासगुप्ता यांनी एप्रिल 2016मध्ये राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना अपात्र घोषित केलं पाहिजे, असं मोईत्रा यांनी म्हटलं आहे. (Swapan Dasgupta tenders resignation from Rajya Sabha after getting BJP ticket)

संबंधित बातम्या:

‘माझी हत्या करुन जिंकणार आहेत काय?’, कोलकात्यात बसून कट रचला जात असल्याचा ममतांचा आरोप!

 ममता बॅनर्जींनी शपथपत्रात गुन्हे लपवले? उमेदवारी रद्द करा, भाजप आक्रमक

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी खेळी, 4 खासदार मैदानात, काय आहे शाहनीती?

(Swapan Dasgupta tenders resignation from Rajya Sabha after getting BJP ticket)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.