'भारत'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसातील कमाई तब्बल...

'भारत'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसातील कमाई तब्बल...

मुंबई : ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना उत्सुकता असलेला ‘भारत’ चित्रपट 5 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 42.30 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. तसेच उद्यापर्यत हा चित्रपट 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करेल अशी शक्यता अनेकांनी वर्तवलं आहे.

सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, “भारत चित्रपटाने सिंगल आणि मल्टिप्लेक्स या दोन्ही चित्रपटगृहात रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने 42.30 कोटीचा गल्ला जमवला होता. त्यानंतर आज 7 जून रोजी भारतने 31 कोटी रुपयाची कमाई केली आहे. म्हणजेच आतापर्यंत या सिनेमाने तब्बल 73.30 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.”

भारतच्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट तिसऱ्याच दिवशी 100 कोटींची कमाई करेल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

भारतने आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपट म्हणून रेकॉर्ड केला आहे. आतापर्यंत सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटाच्या पहिल्या क्रमांकावर ठग्ज ऑफ हिंदोस्तान आहे. या चित्रपटाने 52. 25 कोटींचा गल्ला जमावला होता. तर 44.97 कोटींची कमाई करत हॅप्पी न्यू इयर हा चित्रपट आहे.

वर्ष 2019 मध्ये पहिल्या दिवशी विक्रमी कमाई करणारा दुसरा चित्रपट

भारत चित्रपट वर्ष 2019 मधील पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा चित्रपट आहे. पहिल्या नंबरवर हॉलिवूड चित्रपट अॅव्हेंजर्स अँड गेमने कब्जा केला आहे. अॅव्हेंजर्स अँड गेमने पहिल्याच दिवशी 53 कोटी रुपयांची कमाई केली होती. अँडगेम भारतात चार भाषांमध्ये प्रदर्शित केला होता.

2019 मध्ये पहिल्या दिवशी भरघोस कमाई करणारा चित्रपट

वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये भारत चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली आहे. याआधी कलंक चित्रपटाने पहिल्या दिवशी 21.60 कोटी रुपये, गलीबॉल 19.40 कोटी आणि टोटल धमालने 16.50 कोटी कमवले होते.

2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या टी सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, तब्बू आणि दिशा पटानी या तीन अभिनेत्री दिसणार आहेत.  ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.

संबंधित बातम्या :

‘भारत’कडून बॉक्स ऑफिसवरील 6 विक्रम मोडित

70 देशातील 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर ‘भारत’ रिलीज होणार

…म्हणून यापुढे कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही : दिशा पटाणी

व्हिडीओ : ‘भारत’च्या प्रमोशनदरम्यान सलमानची बॉडीगार्डच्या कानशिलात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *