'2.0' ची दहा दिवसांची कमाई किती?

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परपाड कमाई करत आहे. ‘2.0’ हा सिनेमा 28 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. अवघ्या दहा दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील असंख्य रेकॉर्ड मोडित काढले आहेत. विशेष म्हणजे, बाहुबलीनंतर सर्वाधिक पैसे कमवणारा सिनेमा म्हणून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या …

'2.0' ची दहा दिवसांची कमाई किती?

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परपाड कमाई करत आहे. ‘2.0’ हा सिनेमा 28 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. अवघ्या दहा दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील असंख्य रेकॉर्ड मोडित काढले आहेत. विशेष म्हणजे, बाहुबलीनंतर सर्वाधिक पैसे कमवणारा सिनेमा म्हणून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘2.0’ ने शनिवारी (8 डिसेंबर) हिंदी व्हर्जनमध्ये 9 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर केवळ हिंदी व्हर्जनमध्ये ‘2.0’ ने दहा दिवसात 152 कोटी 25 लाख रुपयांची विक्रमी कमाई केली आहे.

अभिनेता म्हणून रजनीकांतने ‘2.0’ मध्ये नवीन विक्रम केला आहे. तमिळ, तेलगू, हिंदी या सर्व भाषांमध्ये ‘2.0’ ने सर्वाधिक कमाई केली आहे. या आधी रजनीकांतच्या ‘काला’ आणि ‘लिंगा’ या सिनेमाने भारतात अनुक्रमे 120 आणि 100 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता रजनीकांतच्या ‘2.0’ ने 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

भारतात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा हा ‘बाहुबली द कंन्क्लूजन’ हा आहे. ‘2.0’ ने शुक्रवारी (7 डिसेंबर) पर्यंत सर्व भाषांमध्ये 319 कोटींची कमाई केली आहे. तर याआधी सिनेमाने रिलीज होण्याआधीच 490 कोटींची कमाई केली होती.

या 490 कोटींमध्ये ‘2.0’ ने 120 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग तर 370 कोटी रूपयांचे सॅटेलाईट राईट्स यांचा समावेश आहे. तसेच प्रदर्शनापूर्वीही 2.0 ने सर्वाधिक कमाई केल्याचा विक्रम केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *