कंगनासह 61 सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, 49 जणांच्या पत्राला उत्तर

कंगना रणावत (Kangana Ranaut), मधूर भांडारकर (Madhur Bhandarkar), प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांच्यासह 61 कलाकारांनी खुलं पत्र मॉब लिंचिंगचं मर्यादित आणि खोटं चित्र उभं केल्याचा आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामाबद्दल पाठिंबा दिला.

कंगनासह 61 सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, 49 जणांच्या पत्राला उत्तर

मुंबई : देशात जमावाकडून होणाऱ्या हत्यांच्या (Mob Lynching) मुद्द्यावरुन दिग्गजांमध्ये पुन्हा एकदा दोन गट पडले आहेत. गुरुवारी (23 जुलै) 49 दिग्गजांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) पत्र लिहून मॉब लिंचिंगविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर आज अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut),चित्रपट निर्माते मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar), कवी आणि गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांच्यासह 61 कलाकारांनी सरकारच्या समर्थनार्थ खुलं पत्र लिहिलं. यात संबंधित 49 जणांनी मॉब लिंचिंगचं मर्यादित आणि खोटं चित्र उभं केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या 61 जणांनी पंतप्रधान मोदींनाही त्यांच्या कामाबद्दल पाठिंबा दिला.


गुरुवारी वेगवेगळ्या क्षेत्रातील 49 व्यक्तींनी देशात राजकीय असहिष्णुता आणि धार्मिक वातावरण वाढून मॉब लिचिंगच्या घटना वाढत असल्याचे म्हटले होते. तसेच या घटनांचा केवळ निषेध करुन प्रश्न सुटणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले होते. अभिनेत्री अपर्णा सेन (Aparna Sen), दिग्दर्शन निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) , इतिहासकार, लेखक रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांच्यासह 49 जणांनी ते पत्र लिहिले होते.  याउलट कंगना रणावतसह 61 जणांनी असं काहीही होत नसून संबंधित 49 लोक देशाची बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.

मॉब लिंचिंगवर या नव्या पत्रात म्हटले आहे, “पतंप्रधान मोदींनी सबका साथ सबका विकास, सबका विश्वास या घोषणेप्रमाणे काम केलं आहे. अशा घटनांचा पंतप्रधान मोदींनी सार्वजनिकरित्या निषेध केला आहे. 23 जुलै 2019 रोजी स्वयंघोषित रक्षक आणि विवेकाचे रक्षक असलेल्या 49 जणांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र वाचून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पुन्हा एकदा निवडकपणे काळजी व्यक्त केली आहे. यातून त्यांचा राजकीय हेतू आणि दुटप्पीपणाच दिसून येतो.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *