एक बायको, 10 गर्लफ्रेंड आणि 2 हजार महिलांशी संबध, बहिणच निघाली आई; पिक्चरची स्क्रिप्टही नसेल इतकी भयानक हॉलिवूड हिरोची रिअल लाईफ

द मिरर आणि द सन सारख्या अनेक वेबसाइट्सनुसार, जॅक निकोल्सन यांनी जवळपास 2 हजार महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. एका मुलाखतीदरम्यान, जॅकने मी 9 हजार मुलांचा बाप झालो असतो असा खुलासा केला. मला महिलांचा सहवास कमीच वाटायचा. एक वेळ अशी होती की मी एकाच वेळी चार किंवा अधिक महिलांसोबत एकाच वेळी संबध प्रस्तापित केले.

एक बायको, 10 गर्लफ्रेंड आणि 2 हजार महिलांशी संबध, बहिणच निघाली आई; पिक्चरची स्क्रिप्टही नसेल इतकी भयानक हॉलिवूड हिरोची रिअल लाईफ
सिद्धेश सावंत

|

Jun 25, 2022 | 9:51 PM

एक बायको, 10 गर्लफ्रेंड आणि 2 हजार महिलांशी संबध आणि बहिणच निघाली खरी आई. दिसताना हे सर्व एखाद्या पिक्चरच्या स्क्रीप्ट प्रमाणे वाटतयं. मात्र, पिक्चरची स्क्रिप्टही नसेल इतकी भयानक आहे एका हॉलिवूड(hollywood star) हिरोची रिअल लाईफ. हा हिरो दुसरा तिसरा कुणी नसून जॅक निकलसन(Jack Nicholson) आहे. त्याच्या पर्सनल लाईफबाबत अत्यंत खळबळजनक खुलासे झाले आहेत. त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना अत्यंत विचित्र आहेत. जॅक लाइफ(Jack’s Life) या पुस्तकातून जॅकचे खासगी आयुष्य उलगडले आहे.

द शायनिंग, बॅटमॅन आणि अ फ्यू गुड मॅन या चित्रपटांमधील दमदार अभिनयामुळे जॅक एक अव्वल दर्जाचा हॉलिवूड स्टार ठरला आहे. 3 वेळा ऑस्कर पुरस्कार पटकावणारा तो पहिला पुरुष कलाकार आहे. जवळपास 60 चित्रपटांमध्ये त्याने अभिनय केला आहे. बॅटमॅन चित्रपटातील जोकरच्या भूमिकेसाठी जॅकने तब्बल 700 कोटींचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. आजारपणामुळे जॅकला स्मृतीभ्रंश होत झाल्याचे समजते.

मोठी बहिणच होती जॅकची खरी आई

जॅक याच्या आयुष्यातील खाजगी गोष्टींबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. जॅक आयुष्यभर जिला आपली बहीण मानत होता ती खरं तर ती त्याची खरी आई होती. निकोल्सनचा जन्म 22 एप्रिल 1937 रोजी नेपच्यून, न्यू जर्सी येथे झाला. त्याची आई जून फ्रान्सिस ही शोगर्ल होती. 1936 मध्ये, जूनने तिचा सहकारी, शोमन डोनाल्ड फुरसिलोशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना कळले की डोनाल्ड आधीच विवाहित आहे. परिणामी जूनने पतीला सोडले.

पॅट्रिक मॅकगिलिगन या लेखकाने त्याच्या जॅक लाइफ या पुस्तकात अनेक खुलासे केले आहेत. फुरसिलो नाही तर जूनचा व्यवस्थापक एडी किंग हा जॅकचा जैविक पिता असू शकतो असा दावाही या पुस्तकात करण्यात आला आहे. जून अवघ्या 17 व्या वर्षी गर्भवती झाली होती आणि त्यावेळी तिचे लग्नही झाले नव्हते असेही लेखकाने म्हंटले आहे. बदनामीच्या भीतीने जूनच्या पालकांनी ती गर्भवती असल्याचे सगळ्यांपासून लपवून ठेवले. यानंतर त्यांनी जूनसह जॅक निकोल्सनला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभळले. समाजात सन्मानाने जगण्यासाठी जूनच्या कुटुंबियांनी तीला जॅकची आई म्हणून नाही तर मोठी बहीण म्हणून जगण्यास भाग पाडले.

43 वर्षांनंतर सावत्र आईने बहीण खरी आई असल्याचा खुलासा केला

जून निकोल्सन 1963 मध्ये मरण पावल्या. जॅकची मूळ आजी, ज्यांना तो त्याची आई मानत होता त्यांचा मृत्यूही 1970 मध्ये झाला. त्या दोघांच्या मृत्यूनंतर जॅकला सत्य समजले. टाइम मासिकाने 1974 मध्ये याबाबत दावे केले. जॅकला कळले की दोन मुली, जून आणि लॉरेन, ज्यांना तो त्याच्या बहिणी मानत होता, त्या प्रत्यक्षात त्याची आई आणि काकू होत्या. एका महिलेने मासिकाला पत्र लिहून जॅकच्या वडिलांची पहिली पत्नी असल्याचा दावा करताना हा खुलासा केला आहे.

वयाच्या 13 व्या वर्षी घर सोडले

घरच्या परिस्थितीमुळे जॅकला शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. 1950 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी जॅकने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. लोकप्रिय अॅनिमेटर विल्यम हॅना यांच्या कार्यालयात जॅकला किरकोळ नोकरी मिळाली. जॅकच्या कौशल्याने प्रभावित होऊन, त्याला एमजीएम स्टुडिओमध्ये एंट्री-लेव्हल अॅनिमेटर म्हणून नोकरी मिळाली (टॉम अँड जेरी सारखी अनेक उत्कृष्ट कार्टून बनवणारा स्टुडिओ), पण तो इथे अॅनिमेटर नाही तर अभिनेता होण्यासाठी आलो आहे असे सांगून त्याने ती नोकरी नाकारली. यानंतर त्याने अॅक्टिंग स्कूल प्लेअर रिंग थिएटरमध्ये प्रवेश घेतला. येथे त्याची रॉजर कॉर्मनशी मैत्री झाली. रॉजरने त्याला त्याच्या छोट्या बजेट चित्रपट द क्राय बेबी किलरमध्ये एक छोटी भूमिका दिली. या दरम्यान दोघांची घट्ट मैत्री झाली. यानंतर रॉजरने त्याला प्रत्येक चित्रपटात भूमिका देण्यास सुरुवात केली.

वयाच्या 20 व्या वर्षी चित्रपट सोडला, सैनिक झाला

छोट्या भूमिका करून जॅकला ओळख मिळत नव्हती, परिणामी त्याने अभिनयातून ब्रेक घेतला. 1957 मध्ये, वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी, जॅकने कॅलिफोर्नियाच्या एअर नॅशनल गार्डमध्ये शिपाई म्हणून नोंदणी केली. मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो व्हॅन न्यूस विमानतळावर अग्निशामक बनला. 1961 मध्ये बर्लिनच्या संकटाच्या वेळी त्यांनी सेवा केली आणि दोन वर्षांनी संकट संपल्यावर नोकरी सोडली.

लेखक होण्यात यश मिळेल

अभिनय आणि सैनिक झाल्यानंतर जॅक लेखणीकडे वळला. 1967 मध्ये आलेल्या द ट्रिप या चित्रपटाचा पटकथा त्याने लिहिला. सुरुवातीला मुख्य अभिनेता पीटर फोंडा त्याच्या लेखनाने प्रभावित झाला होता, परंतु जेव्हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा अतिशय खराब डिरेक्शनमुळे चित्रपट चांगला चालू शकला नाही. चित्रपट फ्लॉप झाला पण जॅकची लेखणी हिट ठरली.

लेखनासोबतच जॅकने अभिनयातही हात आजमावला. 1969 मध्ये प्रदर्शित झालेला Easy Rider हा चित्रपट त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ज्यासाठी त्याला पहिल्यांदाच ऑस्करसाठी नामांकन मिळाले. या चित्रपटामुळे जॅक रातोरात स्टार बनला. त्यानंतर तो फिडे इझी पीसेसमध्ये दिसला, ज्यासाठी त्याला पुन्हा ऑस्कर नामांकन मिळाले. 1974 मध्ये, रोमन पोलान्स्कीच्या चायना टाउन चित्रपटासाठी त्याला तिसऱ्यांदा ऑस्कर नामांकन मिळाले.

बॅटमॅनचा जोकर बनण्यासाठी 705 कोटी रुपये मिळाले

1989 मध्ये, निकोल्सन बॅटमॅनमध्ये जोकरच्या भूमिकेत दिसला. हा एक आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर चित्रपट होता, ज्यामध्ये जोकर सर्वांना प्रभावित करताना दिसला होता. या चित्रपटात जॅकला जोकर बनण्यासाठी 705 कोटी रुपये मिळाल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.

लाईफ आणि कॉन्ट्रव्हर्सी

चायना टाउन चित्रपटाच्या तीन वर्षानंतर 1977 मध्ये दिग्दर्शक रोमन पोलान्स्कीला जॅक निकोल्सनच्या घरातून अटक करण्यात आली होती. पोलान्स्कीवर १३ वर्षीय मॉडेल सामंथा गेमरने लैंगिक छळाचा आरोप होता.

ओव्हरटेक करताना गोल्फ स्टिकने कार फोडली

8 फेब्रुवारी 1994 रोजी जॅक निकोल्सनने रॉबर्ट ब्लँकची मर्सिडीज फोडली. कारला ओव्हरटेक केल्याच्या रागातून जॅकने रेड सिग्लनवरच त्याच्या कारची काच फोडली. यानंतर जॅकने ब्लँकची माफी मागितली आणि त्याला 4 कोटी नुकसान भरपाई दिली.

एक पत्नी, 10 गर्लफ्रेंड आणि 6 मुले

चित्रपटांव्यतिरिक्त जॅक निकोल्सन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही वादात सापडला होता. त्याला मॅक्सिमच्या टॉप 10 लिव्हिंग लेजेंड्स ऑफ सेक्सच्या यादीत स्थान मिळाले. 1962 मध्ये द टेरर चित्रपटाची सहकलाकार सँड्रा नाईटशी लग्न केले, त्यांना एक मुलगी झाली. लग्नाच्या 4 वर्षानंतर दोघेही वेगळे राहू लागले, 1968 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सँड्रा नंतर, जॅकचे अभिनेत्री सुझान अनस्पॅचशी प्रेमसंबंध होते, ज्याच्या मुलाने जॅकने त्याचे नाव दिले. 1971-72 पासून, जॅक त्याच्या जिवलग मित्राची पत्नी मिशेल फिलिप हिच्याशी रिलेशनशीपमध्ये होता, जी व्यवसायाने गायिका होती. या व्यतिरिक्त जॅक अँजेलिका हटसन, जिल सेंट जॉन, रेबेका ब्रॉसार्ड, लारा फ्लिन बॉयल, कॅट मॉस यांसारख्या अनेक प्रसिद्ध महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अँजेलिका हटसनसोबत त्याचे रिलेशनशीप सर्वाधिक काळ म्हणजेच 17 वर्षे टिकले. त्यांना एकूण 6 मुले होती, त्यापैकी तीन मुले त्यांची होती तर इतर तीन मुलांना त्यांची नावे दिली होती.

2000 महिलांशी संबंध होते यामुळे मी 9 हजार मुलांचा बाप झालो असतो

द मिरर आणि द सन सारख्या अनेक वेबसाइट्सनुसार, जॅक निकोल्सन यांनी जवळपास 2 हजार महिलांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. एका मुलाखतीदरम्यान, जॅकने मी 9 हजार मुलांचा बाप झालो असतो असा खुलासा केला. मला महिलांचा सहवास कमीच वाटायचा. एक वेळ अशी होती की मी एकाच वेळी चार किंवा अधिक महिलांसोबत एकाच वेळी संबध प्रस्तापित केले.

स्मरणशक्ती कमी झाल्याने चित्रपटांना अलविदा

2010 मध्ये, जॅक हाऊ डू यू नो या चित्रपटात शेवटच्या वेळी दिसला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्याची स्मरणशक्ती इतकी कमकुवत झाली होती की वारंवार आठवण करूनही त्यांना त्यांच्या ओळी आठवत नव्हत्या. 2010 पर्यंत त्यांची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली, त्यामुळे त्यांना चित्रपटांपासून दूर राहावे लागले.

3100 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे जॅक

जॅकने आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 60 चित्रपट केले आहेत. कलाकार प्रत्येक चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेत असत, तर त्याने करिअरच्या सुरुवातीच्या काळात फक्त 3 कोटी मानधन घेतले. जॅकची एकूण संपत्ती $400 दशलक्ष आहे, म्हणजे सुमारे 3100 कोटी रुपये इतकी आहे. जॅकने सुमारे 780 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेत त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. याशिवाय लॉस एंजेलिस, हवाई, कोलोरॅडो येथेही त्यांची घरे आहेत. त्याला लक्झरी गाड्यांचाही छंद आहे. त्याच्या कार संग्रहात बीटल, मर्सिडीज 100, मर्सिडीज 500 एसएल, मर्सिडीज आर 129 एसएल आणि रेंज रोव्हर सारखी अनेक वाहने आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें