कारच्या भीषण अपघातात ‘या’ प्रसिद्ध गायकाचा जागीच मृत्यू

या अपघात प्रकरणी 23 वर्षीय सेडान कार चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरवैर सिंग नेहमीप्रमाणे कामावर जात होते. यावेळी हा अपघात घडला.

कारच्या भीषण अपघातात 'या' प्रसिद्ध गायकाचा जागीच मृत्यू
कारच्या भीषण अपघातात प्रसिद्ध गायकाचा जागीच मृत्यूImage Credit source: NDTV India
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 10:15 PM

मेलबर्न : पंजाबी गायक निरवैर सिंग (Nirvair Singh) याचा मंगळवारी ऑस्ट्रेलियात एका भीषण अपघाता (Accident)त मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडियाने पोलिसांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. मेलबर्नजवळ भरधाव किया सेडान गाडीमुळे झालेल्या अपघातात दोन मुलांचा बाप असलेल्या निरवैरचा मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना बुल्ला-डिगर्स रेस्ट रोडवर डिगर्स रेस्ट येथे दुपारी 3.30 वाजता घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी कार चालक अटक

या अपघात प्रकरणी 23 वर्षीय सेडान कार चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरवैर सिंग नेहमीप्रमाणे कामावर जात होते. यावेळी हा अपघात घडला आणि सिंग यांची प्राणज्योत मालवली. किआने आणखी दोन वाहने आणि नंतर एका जीपला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गायकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात एक महिलाही जखमी

या अपघातात जीपमधील एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखळ करण्यात आले आहे. कार परिसरात बेदरकारपणे चालवली जात होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

हे सुद्धा वाचा

आरोपीला दंडाधिकारी न्यायालयात हजर करणार

या अपघात प्रकरणी, किआ कारच्या चालकावर इतर आरोपांसह ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय धोकादायक ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (A famous Punjabi singer died on the spot in a car accident in Australia)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.