सोशल मीडियावर आमिरच्या 'रुबरु रोशनी'ची चर्चा

सोशल मीडियावर आमिरच्या 'रुबरु रोशनी'ची चर्चा

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘रुबरु रोशनी’ या चित्रपटाचे शनिवारी स्टार नेटवर्कवर सात भाषांमध्ये प्रसारण करण्यात आले. प्रसारणानंतर चित्रपट प्रेक्षकांवर या चित्रपटाचा प्रभाव झालेला दिसत आहे. हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंडवर आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईटवर #RubaruRoshni हा हॅश टॅगही ट्रेंड करत आहे.

चित्रपटाच्या टॅगलाईनमध्ये लिहिले आहे की, ‘तीन अविश्नसनीय सच्चि कहानियां और ये ही सच है’. नुकसान आणि माफीच्या आधारवर चित्रपटाची कथा आधारीत आहे. खूप सुंदर असा हा चित्रपट आहे. चित्रपट संपल्यावर ही डॉक्यूमेंट्री तुमच्या डोक्यात फिरत राहिल.

‘रुबरू रोशनी’ मधील ‘रुबरु’ गाण्याच्या लिरिक्स या आमिरच्या बहुचर्चित चित्रपट ‘रंग दे बसंती’मधून तयार करण्यात आल्या आहेत. प्रसून जोशी यांनी हे गाणं गायले आहे आणि ए आर रहमान यांनी रचलं आहे. या गाण्याचे गायक नरेश अय्यर राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जिंकले आहेत. विशेष म्हणजे हा रंग दे बसंती हा चित्रपटही तेरा वर्षापूर्वी 26 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता आणि काल ‘रुबरु रोशनी’ चित्रपट प्रदर्शित झाला.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खान आपल्या चाहत्यांसोबत इनस्टाग्रामवर लाईव्ह गप्पा मारत असताना दिसला होता. त्यावेळी आमिरने आपल्या चित्रपटाबद्दल चाहत्यांना सागितले होते आणि हा चित्रपट पाहणे किती महत्त्वाचे आहे. आमिर खान यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा येणारा चित्रपट हा सत्यमेव जयते चा नवीन एपिसोड नाही. ‘दिल पर लगेगी तभी बात बनेगी’ आणि चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी आमंत्रण देत व्हिडीओ समाप्त केला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *