‘डान्स इंडिया डान्स’चा विजेता सलमान खानवर छेडछाडीचा गुन्हा

मुंबई: डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता सलमान युसूफ खान अडचणीत आला आहे. डान्सर सलमानवर एका तरुणीने छेडछाडीचा आरोप केला आहे. आरोप करणारी तरुणीही डान्सरच आहे. याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमानने आपल्या भावासोबत मिळून तरुणीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, सलमानच्या मॅनेजरने […]

'डान्स इंडिया डान्स'चा विजेता सलमान खानवर छेडछाडीचा गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा विजेता सलमान युसूफ खान अडचणीत आला आहे. डान्सर सलमानवर एका तरुणीने छेडछाडीचा आरोप केला आहे. आरोप करणारी तरुणीही डान्सरच आहे. याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमानने आपल्या भावासोबत मिळून तरुणीशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, सलमानच्या मॅनेजरने गेल्या वर्षी तरुणीशी संपर्क साधला. त्यावेळी ही तरुणी लंडनमध्ये होती. त्यानंतर ती अंधेरीत एका कॉफी शॉपमध्ये सलमानला भेटली. त्यावेळी सलमानने तिला बॉलिवूड पार्क, दुबई इथं त्याच्यासोबत डान्सची संधी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यावेळी सलमानने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तरुणीचा आहे.

सलमानने या तरुणीला नंतर घरी सोडण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी या तरुणीने त्याला नकार दिला. मात्र बॉलिवूडमध्ये हे काही नवं नाही, अशा घटना होतच असतात, असं सलमान तिला म्हणाला. त्यानंतर सलमानच्या मॅनेजरकडून तिला फोन करण्यात आला, मग 20 ऑगस्टला ते दुबईला रवाना झाले.

पीडित तरुणीच्या आरोपानुसार, दुबईत सलमानने तिला 30 ऑगस्टला बहरीनमध्ये शो असल्याचं सांगितलं. ते एअरपोर्टवर पोहोचताच, सलमानने आपल्या दूरच्या भावाशी तिची ओळख करुन दिली. मग प्रवासादरम्यान सलमानच्या भावानेही चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप संबंधित तरुणीचा आहे. सलमानने अनेक दिवस टॉर्चर करुन धमकी दिल्याचा दावा या तरुणीने केला.

सलमान युसूफ खान हा डान्स इंडिया डान्सचा विजेता होता. त्याने एबीसीडी या सिनेमातही काम केलं आहे. त्याने झलक दिखला जा सीझन चारमध्ये कोरियोग्राफर याना गुप्तासोबत काम केलं. शिवाय खतरों के खिलाडी या शोमध्येही सलमान झळकला होता.

View this post on Instagram

A little glimpse of the routine we did in #Lakshmi .. thanks u @salsasneha for making me look good ???????

A post shared by Salmanyusuffkhan (@salmanyusuffkhan) on

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.