…म्हणून ‘डॅड’ने ईशाच्या लग्नात जेवण वाढलं- अभिषेक बच्चन

मुंबई : दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निकच्या लग्नानंतर, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा लग्न सोहळा पार पडला. हा लग्न सोहळा या वर्षी सर्वात जास्त चर्चिला गेला, कारण हा देशातील सर्वात महागडा लग्न सोहळा होता. आपल्या लेकिच्या लग्नावर मुकेश अंबामनींनी 723 कोटी रुपये खर्च केला. त्यामुळे हा लग्न सोहळा […]

...म्हणून ‘डॅड’ने ईशाच्या लग्नात जेवण वाढलं- अभिषेक बच्चन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निकच्या लग्नानंतर, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा लग्न सोहळा पार पडला. हा लग्न सोहळा या वर्षी सर्वात जास्त चर्चिला गेला, कारण हा देशातील सर्वात महागडा लग्न सोहळा होता. आपल्या लेकिच्या लग्नावर मुकेश अंबामनींनी 723 कोटी रुपये खर्च केला. त्यामुळे हा लग्न सोहळा खास ठरला. यासोबतच आणखी एका कारणासाठी हा सोहळा चर्चेत होता.

ईशा-आनंदच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला होता, या व्हिडीओत खुद्द अमिताभ बच्चन हे पाहुण्यांना जेवण वाढताना दिसून आले. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि आमिर खान या व्हिडीओत पाहुण्यांना जेवण वाढताना दिसले.

आपल्या आवडत्या कलाकारांनी असं वाढपी बनलेलं चाहत्यांना पटलं नाही. त्यातचं महानायक अमिताभ बच्चन यांनी पाहुण्यांना जेवण वाढल्याने लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली. आता अभिनेता अभिषेक बच्चन याने या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे.

हा व्हिडीओ बघून एका ट्वीटर यूझरने प्रश्न उपस्थित केला की, अंबानींच्या मुलीच्या लग्नात अमिताभ बच्चन आणि आमिर खान का जेवण वाढत होते. यावर अभिषेक बच्चनने ट्वीट केले की, “लग्नात एक ‘सज्जन घोट’ नावाची परंपरा असते, यामध्ये वधूपक्ष वरपक्षाला जेवण वाढतो.” या पंरपरेला पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चन हे ईशाच्या लग्नात वाढपी बनले होते.

लग्नाला कोणाकोणाची हजेरी?

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचं लग्न 12 डिसेंबरला अंबानींच्या 27 मजली निवासस्थान ‘अँटिलिया’मध्ये पार पडलं. ईशा आणि आनंद यांच्या लग्नाला देशा-विदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दोन्ही कुटुंबाच्या अगदी जवळच्या 550 ते 600 कुटुंबीय या सोहळ्यात आमंत्रित होते. राजकारण, क्रीडा, सिनेसृष्टी, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांनी  या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गृहमंत्री राजनाथ सिंग, रजनीकांत यांसह बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ आणि जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, नव्या नवेली, दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा, अनुपमा चोप्रा, मनीष मल्होत्रा, वैभवी मर्चंट इत्यादी नामवंत उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.