कमल हासन यांच्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात, तिघांचा मृत्यू

दक्षिणात्या सिनेमांचे सुपरस्टार कमल हासन यांच्या 'इंडियन 2' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे

Kamal haasan Film Shooting, कमल हासन यांच्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात, तिघांचा मृत्यू

चेन्नई : दक्षिणात्या सिनेमांचे सुपरस्टार कमल हासन यांच्या ‘इंडियन 2’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली (Accident During Indian 2 Shooting). या दुर्घटनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अभिनेते कमल हासन यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे (Kamal Hassan Movie Shoot Accident).

‘इंडियन 2’च्या शूटिंगदरम्यान क्रेन पडल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मधू (दिग्दर्शक शंकर यांचे वैयक्तिक दिग्दर्शक), कृष्णा (सहाय्यक दिग्दर्शक) आणि एक स्टाफ कर्मचारी चंद्रनचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या सिनेमाचं शूटिंग चेन्नईजवळ सुरु होतं.

याबाबत कमल हासन यांनी तामिळमध्ये ट्वीट केलं. “आजच्या भीषण अपघातात मी तीन साथीदार गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांबद्दल मला सहानुभूती आहे. मी देखील त्याच्या दु:खामध्ये त्यांच्यासोबत आहे”, असं ट्वीट कमल हासन यांनी केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *