'सूर्यवंशी'मधला थरारक सीन कसा शूट केला? अक्षय कुमारकडून व्हिडीओ शेअर

अॅक्शन किंग आणि अॅक्शन दिग्दर्शक ही जोडी कुठल्या सिनेमात एकत्र काम करेल, तर त्यात अॅक्शनचा ओव्हरडोज असणं सहाजिकच आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमारने नुकताच शेअर केला.

'सूर्यवंशी'मधला थरारक सीन कसा शूट केला? अक्षय कुमारकडून व्हिडीओ शेअर

मुंबई : बॉलिवूडचा ‘अॅक्शन किंग’ अक्षय कुमार आणि अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टी ही जोडी पहिल्यांदाच ‘सूर्यवंशी’ या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. अॅक्शन किंग आणि अॅक्शन दिग्दर्शक ही जोडी कुठल्या सिनेमात एकत्र काम करेल, तर त्यात अॅक्शनचा ओव्हरडोज असणं सहाजिकच आहे. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमारने नुकताच शेअर केला. अक्षय कुमारने ट्विटरवर त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या सिनेमाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला.

“ज्या दिवसापासून अॅक्शनमुळे माझं नशीब बनलं, तेव्हापासून अॅक्शन माझ्यासाठी लाईफलाईन झाली आहे. अॅक्शन माझ्यासाठी एवढी महत्त्वाची का आहे, त्यासाठी मी नेहमी इतका उत्साही का असतो, हे तुम्हाला सूर्यवंशीमधील खरे आणि अनकट अॅक्शन सीन्सपाहून नक्की लक्षात येईल”, असं ट्वीट अक्षयने केलं.

अक्षय कुमारने हा व्हिडीओ शेअर करताच अवघ्या आठ मिनिटांत सिनेमा निर्माता करण जौहरनेही त्याच्या ट्विटर हॅण्डलवर हा व्हिडीओ शेअर केला. यासोबतच करणेने दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारचं कौतुकही केलं आहे. “रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार सोबत येतात, तेव्हा असं काहीतरी घडतं”, असं करण म्हणाला.

हा व्हिडीओ 54 सेकंदांचा आहे. व्हिडीओत सूर्यवंशी सिनेमाच्या सेटवर अक्षय अवघड असे स्टंट करताना दिसत आहे. अक्षय कधी कारचा पाठलाग करत आहे, तर कधी हेलिकॉप्टरवर लटकलेला दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवरुन ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा अक्षयच्या चाहत्यांसाठी एंटरटेनमेंटची मेजवानी ठरणार आहे, हे नक्की.

अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच एकत्र ‘सूर्यवंशी’ सिनेमात काम करत आहेत. या सिनेमाचं सुरुवातीचं शूटिंग मे महिन्यात मुंबईत झालं, त्यानंतर सध्या बँकॉकमध्ये या सिनेमाचं पुढील शूटिंग सुरु आहे. ‘सूर्यवंशी’ सिनेमात कतरिना कैफ आणि निना गुप्ता यांचीही प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 27 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *