Happy Birthday Arjun Rampal | मॉडेलिंग, अभिनय, अफेअर, ड्रग्ज केस… अभिनेता अर्जुन रामपालचा प्रवास!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Actor Arjun Rampal) आज (26 नोव्हेंबर) आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:35 AM, 26 Nov 2020

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Actor Arjun Rampal) आज (26 नोव्हेंबर) आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 नोव्हेंबर 1972 रोजी जबलपूरमध्ये अर्जुन रामपालचा जन्म झाला होता. तर, महाराष्ट्रातील नाशिकमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. आपण अभिनय क्षेत्रात जावे किंवा मॉडेलिंग करावे, असे त्याने काहीच ठरवले नव्हते. पहिल्याच वेळी रॅम्पवर चालायला घाबरणारा अर्जुन रामपाल पुढे जाऊन भारताचा सुपर मॉडेल बनेल, असे कोणालाच वाटले नव्हते (Actor Arjun Rampal Birthday Special).

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अर्जुन रामपालने मॉडेलिंग क्षेत्रात नाव गाजवले. 1994मध्ये ‘सोसायटी फेस ऑफ द इयर’ म्हणून त्याची निवड झाली होती. पहिल्याच वेळी रॅम्पवर उतरल्यावर घाबरल्यामुळे पाय थरथर कापत होते. त्यावेळी सोबत असणारी मॉडेल मेहर हिचा हात मी घट्ट पकडून ठेवल्याचे, अर्जुनने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. याच मॉडेल मेहरशी नंतर अर्जुन रामपालने लग्न केले होते.

मेहेरशी लग्न, घटस्फोट…

अर्जुन रामपालने एका मुलाखतीत सांगितले होते की, वसतिगृहात राहत असताना तो आपल्या खोलीत मेहरचे पोस्टर लावले होते. बायको असावी तरी अशीच, असे त्याला नेहमी वाटायचे. नंतर अर्जुनने 1998मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’ मेहर जेसियाशी लग्न केले. मेहर आणि अर्जुनला मायरा आणि माहिका नावाच्या दोन मुली आहेत. परंतु, आता मेहर आणि अर्जुन वेगळे झाले आहेत.

लग्नाच्या 21 वर्षानंतर अर्जुन आणि मेहरचे मार्ग वेगळे झाले. दोघांनीही आपले नाते वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पण ते शक्य न झाल्यामुळे दोघांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपले नाते तोडत विभक्त होण्याची घोषणा केली होती (Actor Arjun Rampal Birthday Special).

एप्रिल 2019मध्ये अर्जुन आणि मेहरचा घटस्फोट झाला. त्यांच्या दोन्ही मुली मायरा आणि माहिका आपल्या आईबरोबर अर्थात मेहरसोबत राहतात. यानंतर अर्जुन रामपाल पुन्हा प्रेमात पडला. सध्या अर्जुन आणि त्याची प्रेयसी गॅब्रिएला मुंबईत एकत्र राहतात. त्या दोघांनाही एक मुलगा आहे.

(Actor Arjun Rampal Birthday Special).

ड्रग्ज प्रकरणात चौकशी

सध्या अर्जुन रामपाल बराच चर्चेत आहे. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबी’ने त्याच्या घरावर धाड टाकली होती. या छाप्यात एनसीबीने काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह, बंदी घातलेली औषधे जप्त केली होती. त्यानंतर अर्जुनला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले. 7 तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका झाली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अर्जुन रामपाल शेवट ‘डॅडी’ या चित्रपटात दिसला होता. नुकतेच त्याने डिजिटल विश्वातही पदार्पण केले आहे. ‘द फाइनल कॉल’ या वेब सीरीजमध्ये तो झळकला होता.

(Actor Arjun Rampal Birthday Special)