'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते प्रवीण तरडे यांच्या कारला पुण्यात अपघात, थोडक्यात बचावले

'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम लेखक-दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या कारला पुण्यात अपघात झाला होता, सुदैवाने गाडीतील सर्वजण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.

'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते प्रवीण तरडे यांच्या कारला पुण्यात अपघात, थोडक्यात बचावले

पुणे : प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarade) आणि अभिनेते रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांच्या कारला पुण्यात अपघात (Pune Car Accident) झाला. सुदैवाने गाडीतील कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी यांच्यासोबत गाडीत कार्यकारी निर्माते विशाल चांदणेही होते. गाडीला काल (मंगळवारी) रात्री 11 वाजताच्या सुमारास अपघात झाला. सासवडजवळ हिवरे गावात असलेल्या महादेव मंदिरासमोर ही घटना घडली.

सुदैवाने गाडीतील एअर बॅग्जमुळे या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. तरडे परदेशी आणि चांदणे सुखरुप आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन चाहत्यांना करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच सासवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

कोण आहेत प्रवीण तरडे?

44 वर्षीय प्रवीण तरडे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट प्रचंड गाजला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पुण्यातील पौड रस्त्यावरील तरडेंच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाणही करण्यात आली होती.

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासोबतच फँड्री, अजिंक्य, देऊळ बंद, लग्न मुबारक यासारख्या सिनेमांमध्येही प्रवीण तरडे यांनी भूमिका केल्या आहेत. ‘आरारारा… खतरनाक’ या स्टाईलसाठी ते फेमस आहेत.

अपघाताच्या वेळी तरडेंसोबत असलेल्या रमेश परदेशी यांनी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात साकारेलली पिट्या भाईची भूमिका गाजली होती.

आनंद शिदेही अपघातातून बालंबाल बचावले

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीलाही मंगळवारी भीषण अपघात झाला होता. अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली, मात्र त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला.

मुंबईहून सांगोल्याच्या दिशेने जात असताना इंदापूरजवळ आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला होता. इंदापूरमधील खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *