Baba Ka Dhaba | ‘यामुळेच लोक मदतीला कचरतात’, बाबाची फसवणूक करणाऱ्यांवर आर. माधवन संतापला!

कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने ‘बाबा का ढाबा’ चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते.

Baba Ka Dhaba | ‘यामुळेच लोक मदतीला कचरतात’, बाबाची फसवणूक करणाऱ्यांवर आर. माधवन संतापला!
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 3:40 PM

मुंबई : रातोरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’चे (Baba Ka Dhaba) मालक कांता प्रसाद यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. ‘बाबा का ढाबा’च्या बाबांच्या मदतीसाठी जनतेला आवाहन करण्यात आले होते. देशभरातून अनेक मदतीचे हात या वृद्ध दांपत्यासाठी पुढे आले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ 2 लाख रुपये इतकीच रक्कम त्यांना देण्यात आली. बाकीचे पैसे हडपल्याचा दावा करत त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आर. माधवननेही (R. Madhavan) बाबाची फसवणूक करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.(Actor R Madhavan tweeted about fraud at Baba Ka Dhaba)

कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने ‘बाबा का ढाबा’ चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते. मात्र, युट्यूबर गौरव वासनने या दांपत्याचा केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्या ढाब्यावर अक्षरशः लोकांची रीघ लागली होती.

माधवन भडकला!

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी केलेल्या या आरोपांमध्ये किती सत्य आहे, हे तपासानंतर कळणार आहे. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर व्हिडीओ तयार करणाऱ्या युट्यूबर गौरव वासनला इंटरनेटवर ट्रोल केले जात आहे. सदर घटनेवर अभिनेता आर माधवन यांनीही ट्विट करत रोष व्यक्त केला आहे. (Actor R Madhavan tweeted about fraud at Baba Ka Dhaba)

‘बाबा का ढाबाच्या वृद्ध मालकाची फसवणूक झाली? अशा प्रकारच्या गोष्टीच लोकांना चांगले काम करण्यास प्रतिबंधित करतात, अशा गोष्टी लोकांना चांगले काम न करण्याचे कारण देतात. हे चुकीचे आहे. आता जेव्हा ही फसवणूक उघडकीस येईल आणि त्यांना शिक्षा होईल, तेव्हाच लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास पुन्हा येईल. दिल्ली पोलीस आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे’, अशा आशयाचे ट्विट माधवनने (R Madhavan) केले आहे.

का केली तक्रार?

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांच्या तक्रारीत त्यांनी गौरव वासनने पैशांची हेराफेरी केल्याचे म्हटले आहे. गौरवने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ तयार करताना सगळ्यांना मदतीचे आवाहन केले होते. या मदत निधीसाठी त्यांने स्वतःच्या खात्याचा तपशील दिला होता. मात्र, हे पैसे आपल्यापर्यंत पोहचलेच नसून, गौरवने हडप केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली. मात्र, अद्याप गौरव वासनविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

काही दिवसांपूर्वी युट्यूबर लक्ष्य चौधरीने देखील गौरववर असाच आरोप केला होता. त्यानंतर आता कांता प्रसाद यांनी देखील कारवाईचे मोठे पाऊल उचलल्याने सगळ्यांच्या नजरा विस्फारल्या आहेत. (Actor R Madhavan tweeted about fraud at Baba Ka Dhaba)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.