
बॉलिवूडचा किंग अर्थात सलमान खान आणि पार्ट्यांचे जवळचे संबंध आहेत. सलमान खान याचे पनवेल येथील फार्महाऊस पार्ट्यांसाठी फेमस आहे. राघव जुयाल सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसवर तब्बल तीन दिवस होता. या फार्महाऊसवर रात्रभर पार्ट्या सुरू असतात. हेच नाही तर धक्कादायक खुलासा करत राघव जुयाल याने सांगितले की, सलमान खान घोड्यांची मिटिंग बघण्यासाठी सर्वांना घेऊन गेला होता. रणवीर इलाहबादिया याच्या शोमध्ये राघव याने काही खुलासे केले आहेत. सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर नेमके काय सुरू असते हे स्पष्ट राघव याने सांगितले.
राघव जुयालने म्हटले की, जो मजा तिथे आला, त्याला काही सीमाच नाही. सलमान खानला लोकांचे लक्ष कसे ठेवायचे हे चांगल्याप्रकारे जमते. तिथे खतरनाक अशी पार्टी झाली. त्यानंतर मी तिथे घोड्यांची मिटिंग बघितली. सलमान खानने म्हटले की, चला आपण घोड्यांची मिटिंग बघूयात. ज्यावेळी सलमान खान आम्हाला घोड्यांची मिटिंग बघायला घेऊन गेला होता, त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असे काहीतरी बघितले.
सलमान खानच्या फार्महाऊसची मजा काहीतरी वेगळीच आहे. मुळात सलमान खान याचे फार्महाऊस एखाद्या 5 स्टार हॉटेलपेक्षाही अधिक आलिशान आहे. तिथे रात्रभर पार्ट्या चालतात. जग वेगळे चालत आहे आणि त्यांची दुनिया वेगळी सुरू आहे. नेहमीच सलमान खान अधिक वेळ आपल्या पनवेल फॉर्महाऊसवर घालवताना दिसतो. सोशल मीडियावर सलमान खान पनवेल फॉर्म हाऊसचे फोटोही शेअर करताना दिसतो. सलमान खानचे कुटुंबिय देखील त्याचठिकाणी चांगला वेळ घालवतात.
अभिनेत्याचे हे फॉर्म हाऊस बिश्नोई टोळीने दिलेल्या धमकीनंतर चर्चेत आले. बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी काहीवेळा या फॉर्म हाऊसची रेकी केल्याची माहिती पोलिस तपासाता पुढे आली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर देखील फॉर्म हाऊसची रेकी करून गेले होते. आता सलमान खानच्या या फॉर्म हाऊसची सुरक्षा अधिक वाढवल्याचे देखील समजते. त्यामध्येच आता राघव याने इतका मोठा खुलासा सलमान खानच्या फॉर्म हाऊसबद्दल केला.